सातबारा दुरुस्ती आता ऑनलाईन स्वतः करा दुरुस्त.

शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतीच्या सातबऱ्यावर काही चूक झालेली असेल तर ती दुरुस्त करायची तर सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. त्यामध्ये आपला खूप वेळ वाया जातो तर मित्रांनो आता तुमचा वेळ वाचणार म्हणजे तुम्ही आता तुमचा सातबारा दुरुस्ती ऑनलाईन करू शकता. सातबारा दुरुस्ती ऑनलाईन अर्ज सादर करतांना तुम्हाला जुना हस्तलिखित सातबारा अपलोड करावा लागणार आहे तो सातबारा कसा असतो आणि त्यासाठी जो अर्ज करावा लागतो तो अर्ज देखील मी या ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. खाली दिलेल्या लिंकला क्लिक करून हस्तलिखित सातबऱ्यासाठी लागणारा अर्ज pdf मध्ये डाउनलोड करून घ्या.

सातबारा दुरुस्ती अर्ज करण्यासाठी प्रोसेस

सातबाऱ्यावर जमिनीचे क्षेत्र आपोआप कमी झालेले असेल तर अशा वेळी तुम्हाला तुमच्या तलाठी अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागतो. तलाठी साहेबांकडे अर्ज करण्यासाठी तुम्हाला कदाचित तालुक्याच्या ठिकाणी जावे लागेल यासाठी वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होऊ शकतात. परंतु जर तुम्ही ऑनलाईन सातबारा दुरुस्ती अर्ज केला तर अगदी घरी बसून तुम्ही तुमच्या जमिनीचे कमी झालेले क्षेत्र असो किंवा सातबाऱ्यावर चुकीचे नाव नोंदणी झाली असेल तर त्यासाठी अगदी घरी बसून अर्ज करू शकतात.

ऑनलाईन सातबारा दुरुस्ती अर्ज कृती

 • गुगलच्या सर्च बारमध्ये टाईप करा https://bhulekh.mahabhumi.gov.in/ आणि सर्च करा किंवा तुम्ही डायरेक्ट https://pdeigr.maharashtra.gov.in/ हा वेब ॲड्रेस टाईप करा.
 • तुम्ही जर महाभूमी अभिलेख या वेबसाईटवर असाल तर पब्लिक डाटा एण्ट्री या वेबसाईटची या वेबसाईटच्या एकदम खालच्या बाजूला लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा.
 • पब्लिक डाटा एण्ट्री या वेबसाईटवर आल्यावर या ठिकाणी काही सूचना दिसतील त्या वाचून घ्या.
 • लॉगीन करण्यासाठी proceed to login  या बटनावर क्लिक करा.
 • तुमच्याकडे युजर नेम आणि पासवर्ड असेल तर लॉगीन करा आणि नसेल तर Create new user account या बटनाला क्लिक करून नवीन नोंदणी करून घ्या.
 • लॉगीन केल्यानंतर या ठिकाणी अनेक पर्याय तुमच्या डॅशबोर्डला दिसेल त्यापैकी 7 12 Mutations या पर्यायावर क्लिक करा.
 • select role type मध्ये User is citizen या पर्यायावर क्लिक करा.

आणखी कामाची योजना शेतकरी ट्रॅक्टर योजना अनुदान नवीन GR


तलाठ्याकडे ज्या फेरफार प्रकारासाठी अर्ज करायचा आहे तो फेरफार प्रकार निवडा

 • या ठकाणी एक फॉर्म तुमच्या स्क्रीनवर येईल पहिल्या पर्यायामध्ये तुमचा जिल्हा निवडा.
 • तालुका निवडा.
 • त्यानंतर गाव निवडा.
 • ऑनलाईन सातबारा दुरुस्ती

जशीही तुम्ही वरील माहिती निवडाल तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर खालील पर्याय दिसतील

 • इकरार.
 • वारस नोंद.
 • बोजा कमी करणे.
 • मयताचे नाव कमी करणे.
 • खातेदाराची माहिती भरणे.
 • वरील माहिती जतन करा.

वरील सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीच्या ८ अ चा खाते क्रमांक टाकायचा आहे आणि खातेदार निवडा या बटनावर क्लिक करायचे आहे. जसे हि तुम्ही हि कृती कराल तर तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर तुमच्या जमिनीची तपशील येईल.

प्रकार निवडा.

 • खातेदाराच्या नावातील दुरुस्ती करणे.
 • सात बारा वरील एकूण क्षेत्र व एकक दुरुस्त करणे.
 • खातेदाराची क्षेत्र दुरुस्ती करणे.

वरील प्रकार तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर दिसेल त्यापैकी एक प्रकार निवडा. हा सातबारा दुरुस्ती ऑनलाईन अर्ज सादर करतांना तुम्हाला जुना हस्तलिखित सातबारा अपलोड करायचा आहे. तर अशा प्रकारे तुमची तुमच्या सातबारा वरील चुकलेले नाव किंवा जमिनीचे क्षेत्र कमी झाले असेल तर ते पूर्ववत करणे आणि इतर दुरुस्तीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

Leave a comment