महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2022

आज आपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ची पुर्णपणे माहिती जाणून घेणार आहोत आहोत. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, योजनेचा लाभ, या सर्व गोष्टींचा माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. दिनांक १३ एप्रिल २०१७ अन्वये ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ दि.१ एप्रिल २०१७ पासून ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ या नावाने सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सर्वप्रथम आपण बघूया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे उद्दिष्ट काय आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे उद्दिष्ट

या योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या गरीब लोकांवर उपचार करणे आहे. यासाठी राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबवले जाते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति कुटुंब प्रति वर्ष 1.50 लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण मिळते. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा 2.50 लाख रुपये मर्यादा आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना पात्रता

  • अर्जदाराचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे नागरिक असणे गरजेचे आहे.
  • या योजनेतील अर्जदार हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल गरीब कुटुंबाचे आणि त्यांचे उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी असणारे सर्व राज्यातील नागरिक हे या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
  • महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामधील गरीब कुटुंबातील कोणत्याही रंगाचे रेशन कार्ड असलेल्या म्हणजेच पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे. त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीने ग्रस्त असलेले शेतकरी लाभ घेऊ शकतात. लाभ घेण्यास पात्र असणार आहेत.

जन आरोग्य योजना 2022 साथी लागणारी कागदपत्रे

  • सरकारी डॉक्टरांनी दिलेले आजाराचे प्रमाणपत्र
  • अर्जदाराची तीन पासपोर्ट छायाचित्रे
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • उत्पन्नचे प्रमाणपत्र
  • वय प्रमाणपत्र

महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणीची प्रक्रिया

  • सर्वात आधी तुम्हाला MJPJAY च्या Official Website वर जावे लागेल. (Official Website https://www.jeevandayee.gov.in/)
  • नंतर तुमच्या समोर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2021 चे मुखपृष्ठ ओपन होईल.
  • मुखपृष्ठावर नवीन नोंदणी (New Registration) च्या लिंक वर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
  • नंतर तुमच्या स्क्रीन वर नवीन फॉर्म दिसेल.
  • या फॉर्म मध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल. आणि आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • त्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा. तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

कामाची योजना स्वाधार योजना माहिती PDF अर्ज 

योजनेचा व्हिडिओ बघा

जन आरोग्य योजनेत खालील उपचार समाविष्ट असणार आहेत

सर्वसाधारण शस्त्रक्रिया

काम, नाक घसा शस्त्रक्रिया

नेत्ररोग शस्त्रक्रिया

स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र

अस्थिरोग शस्त्रक्रिया व प्रक्रिया

पोठ व जठार शस्त्रक्रिया

कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जरी

बालरोग शस्त्रक्रिया

प्रजनन व मूत्र रोग शस्त्रक्रिया

मज्जातंतूविकृती शास्त्र

कर्करोग शस्त्रक्रिया

वैद्यकीय कर्करोग उपचार

रेडीओथेरपी कर्करोग

त्वचाप्रत्यारोपण शस्त्रक्रिया

जळीत

पॉलिट्रामा

प्रोस्थेसिस

जोखिमी देखभाल

जनरल मेडिसिन

संसर्गजन्य रोग

बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन

हृदयरोग

नेफ्रोलोजी

न्युरोलोजी

पल्मोनोलोजी

चर्मरोग चिकित्सा

रोमेटोलोजी

इंडोक्रायनोलोजी

मेडिकल गेस्ट्रोइंट्रोलोजी

इंटरवेन्शनल रेडीओलोजी

जन आरोग्य योजना हॉस्पिटल लिस्ट

  • सर्वात आधी अधिकृत वेबसाइट वर जा. तुमच्या समोर मुखपृष्ठ ओपन होईल.
  • मुखपृष्ठावर Network Hospital म्हणून ऑप्शन तुम्हाला दिसेल, नंतर त्यावर क्लिक करा.
  • महात्मा फुले जन आरोग्य योजना हॉस्पिटल लिस्टपर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढील पृष्ठ संगणकाच्या स्क्रीनवर तुमच्यासमोर उघडेल.
  • या पृष्ठावर आपल्याला रुग्णालयांची यादी दिसेल. अशा प्रकारे आपण आपल्या सोयीनुसार हॉस्पिटलची निवड करू शकता.

अशाच विविध शासकीय योजनांची माहिती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा यासाठी खलील ग्रुप लिंक वर क्लिक करा.

ग्रुप लिंक

2 thoughts on “महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2022”

Leave a comment