शेतकरी बंधूंनो तुम्हाला Pm kisan samman nidhi या योजनेबद्दल माहिती तर असेलच, पीएम किसान सन्मान निधि योजना म्हणजे आपल्या सध्या भाषेत मोदीचे 2000 रुपयाचा हफ्ता तर याच योजनेसाठी 2022 नोंदणी सुरू झाली आहे. तरी या योजनेची ऑनलाइन नोंदणी सुरू झालेली आहे तुम्ही आपल्या मोबाइलवरून सुद्धा या योजनेसाठी नोंदणी करू शकता.
नमस्कार शेतकरी मित्रानो आपण आज या लेखात pm kisan samman nidhi योजनेची माहिती पाहणार आहोत, मित्रानो तुम्ही जर अजूनही pm kisan योजनेचा लाभ घेतला नसेल तर तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकाल याची माहिती आपण पाहणार आहोत.
तुम्हाला माहितीच असेल कि pm kisan samman nidhi योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये तीन वेळा ६००० रुपये दिले जाते. pm kisan योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुहप्ता जमा केला जातो.
आणखी कामाची योजना PM kisan Ekyc करणे आवश्यक नाहीतर मिळणार नाही मोदीचे पैसे
Pm kisan samman nidhi 2022 नोंदणी पद्धत खालीलप्रमाणे
- pm kisan sanman nidhi.gov.in या संकेत स्थळावर शेतकऱ्यांना त्यांची ऑनलाईन नोंदणी करावी लागते.
- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढावी.
- ऑनलाईन अर्जाची प्रिंट, संबधित कागदपत्रे आणि तलाठी याचा फॉर्म तहसील कार्यालय येथे सादर करावा.
Pm kisan samman nidhi 2022 मोबाईलमधून नोंदणी पद्धत
- ब्राउजरच्या युआरएल बारमध्ये PM Kisan Samman nidhi हा शब्द टाईप करा
- जसे हि तुम्ही वरील किवर्ड टाईप कराल त्यावेळी तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर पीएम किसान सन्मान निधीची अधिकृत वेबसाइट ओपन होईल.
- या वेबसाईटवर farmers corner या हेडिंगच्या खाली new farmer registration असा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- जसे हि तुम्ही या पर्यायावर क्लिक कराल त्यावेळी new farmer registration form ओपन होईल.
- या अर्जामध्ये शेतकऱ्यांना त्यांचा मोबाईल नंबर, आधार नंबर, राज्य इत्यादी माहिती टाकावी लागणार आहे. हि सर्व माहिती टाकल्यानंतर send otp या बटनावर क्लिक करायचे आहे.
अर्जदाराची व्यक्तिगत माहिती
- शेतकऱ्याने त्यांचे गाव, तालुका, जिल्हा, राष्ट्र, नाव, लिंग आणि कॅटेगरी व्यवस्थित टाकावी.
- शेतकऱ्यांचा प्रकार या मध्ये जर शेतकरी लहान वर्गातील असेल म्हणजे १ ते २ हेक्टर जमीन असेल तर small हा पर्याय निवडावा आणि यापेक्षा मोठा असेल तर other हा पर्याय निवडावा.
- शेतकऱ्याने त्यांचे खाते ज्या बँकेत असेल त्या बँकेचे नाव, ifcs code, खाते नंबर इत्यादी माहिती व्यवस्थित टाकावी.
- शेतकऱ्याने त्यांचा पूर्ण पत्ता, पोस्टल पिनकोड नंबर, ८ अ वरील खाते नंबर, राशन कार्ड नंबर, जन्मतारीख इत्यादी माहिती व्यवस्थित टाकावी.
Land record information
वरील सर्व माहिती भरल्यानंतर शेतकऱ्याने त्यांच्या नावावर जेवढी जमीन असेल त्या संबधीची माहिती व्यवस्थित टाकावी जसे कि
- शेतकऱ्यांच्या नावावर असलेले क्षेत्र.
- सर्वे नंबर.
- खाता नंबर.
वरील प्रमाणे सर्व कागदपत्रे अपलोड करावीत. कागदपत्रे व्यवस्थित अपलोड केल्यानंतर self declaration form समोरील चौकटीमध्ये टिक करावे आणि सर्वात शेवटी दिसत असलेल्या सेव्ह या बटनावर क्लिक करावे.
सी.एस.सी. आयडी आणि पासवर्ड चा उपयोग करून खालील प्रमाणे सादर करा पीएम किसान सन्मान निधीचा अर्ज.
- तुमच्या कॉम्प्युटरच्या ब्राउजरमध्ये टाईप पीएम किसान सन्मान निधी
- वेबसाईट ओपन झाल्यानंतर csc login या पर्यायावर क्लिक करा.
- सीएससी युजर आयडी, पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉग इन करा.
- ज्या पद्धतीने new farmer registration या पर्यायावर क्लिक करून अर्ज भरावा लागतो अगदी त्याच पद्धतीने सीएससी लॉगीन करून हा पीएम किसान सन्मान निधीचा अर्ज भरावा लागणार आहे दोन्ही ठिकाणी सारखीच पद्धत आहे.
पेमेंट प्रोसेस
- अर्ज भरल्यानंतर make पेमेंट या बटनावर क्लिक करा.
- आधार नंबर आणि कॅपचा कोड सर्च करा.
- आता तुम्ही जो अर्ज सादर केलेला आहे त्या संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल. या ठिकाणी make payment असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- तुमचा सीएससी आयडीचा पासवर्ड या ठिकाणी टाका आणि validate या बटनावर क्लिक करा.
- त्यांतर wallet pin टाका.
- wallet pin टाकल्यानंतर पेमेंट केल्याचे डीटेल्स दिसेल ते प्रिंट करून घ्या.
- ज्या शेतकऱ्याचा ऑनलाईन अर्ज भरलेला आहे त्या अर्जाची प्रिंट काढून घ्या आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे संबधित अधिकारी साहेबांकडे हा अर्ज सादर करा.
- अशा प्रकारे सीएससी लॉगीन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही हा अर्ज सादर करू शकता.
अधिक महितीसाठी खलील व्हिडिओ बघा.