नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे पिक कर्ज नोंदणी नवीन लिंक सुरू झाली आहे. तर ही नवीन लिंक कोणती आहे आणि ती कोठे मिळेल या विषयी पूर्ण माहिती आपण या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहे. अनेक शेतकरी बांधवाना शेतीसाठी कर्ज हवे असते. बँकेकडून कर्ज मिळाले नाही तर सावकाराकडून अशा शेतकरी बांधवाना कर्ज घ्यावे लागते. अशावेळी जर शेतकऱ्यांना बँकेचे कर्ज मिळाले तर नक्कीच शेतकऱ्याचे सोईचे होऊन जाते.
पिक कर्ज नोंदणी नवीन लिंक उपलब्ध.
आता कर्ज मागणी करण्यासाठी नवीन लिंक जालना जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आलेली आहे. या लिंकवर क्लिक करून जालना जिल्ह्यातील शेतकरी त्यांचा अर्ज सादर करू शकतात. नवीन लिंकद्वारे पिक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती पहा.
पूर्वी कर्ज मागणीसाठी गुगल लिंक देण्यात आली होती. या लिंकवर क्लिक करून शेतकऱ्यांना त्यांच्या शेत जमिनीचे तसेच बँकेचे सर्व तपशील टाकून अर्ज सादर करावा लागत होता. कर्ज मागणी अर्ज गुगल फॉर्मवर सादर केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती कळत नव्हती.
आणखी हेही वाचा शौचालय योजना ऑनलाइन फॉर्म सुरु करा अर्ज
पिक कर्ज ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.
- https://jalna.cropsloan.com/ या वेबसाईटला भेट द्या .
- वेबसाईटओपन झाल्यावर या ठिकाणी दोन लिंक दिसतील १) नवीन कर्जासाठी येथे क्लिक करा. २) अर्जाची सद्यस्थिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- नवीन अर्ज करण्यासाठी नवीन कर्जासाठी येथे क्लिक करा क्लिक करा या पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर पिक कर्ज नोंदणी अर्ज ओपन होईल. त्यामध्ये विचारलेली माहिती भर आणि अर्ज सादर करा.
- तुम्ही केलेल्या अर्जाची सद्यस्थिती बघण्यासाठी अर्जाची सद्यस्थिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा या लिंकवर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती दिसेल.
अधिक महितीसाठी खलील व्हिडिओ बघा