सुधारित पैसेवारी जाहीर झाली असून यामध्ये कोणत्या गावाला मदत मिळणार आहे व किती मिळणार आहे त्याची माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
यंदाचा संपलेला खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी खूप मोठा आर्थिक फटका देणारा ठरला.
जून महिन्यात फिस्कटलेले पेरणीचे वेळापत्रक त्यानंतर गोगलगाय, पैसा यांनी सोयबिन वर केलेल्या हल्ला यातून वाचलेल्या पिकाची शेवटी पावसाने लावलेली वाट,
यातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच आले नाही.
आता प्रशासनाने सुधारित पैसेवारी देण्याचे कळवण्यात आले आहे ती पैसेवारी 50 पैशांच्या खाली असल्याने आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सोबत अन्य मदतीची देखील अपेक्षा आहे.
आणखी कामाची योजना विहीर अनुदान योजना 4 लाख अनुदान
सुधारित पैसेवारी जाहीर शेतकऱ्यांना मिळणार मदत
कळंब तालुक्यात आठही मंडळात सुधारित पैसेवारी 50 च्या खाली आहे या मंडळात 78 खरीप पिके घेणारी तर 19 गावे दोन्ही हंगाम घेणारी आहे.
तालुक्यात 17 गावात सरासरी 47 टक्के पैसेवारी आली आहे. याबाबत अहवाल तहसीलदाराकडे सादर केला आहे.
हा अहवाल पुढे शासनाकडे सादर केला जाईल व पुढील कार्यवाही सुरू होईल. मात्र, पैसेवारी अहवाल शेतकऱ्यांना दिलासा देणारा मानला जात आहे.
कधी जाहीर केली जाते पैसेवारी
राज्यात कोकण, पुणे, नाशिक विभागात 15 सप्टेंबर तर नागपूर, औरंगाबाद, अमरावती विभागात 30 सप्टेंबरला हंगामी पैसेवारी जाहीर करतात.
आणि अंतिम पैसेवारी अनुक्रमे 15 डिसेंबर आणि 15 जानेवारीला जाहीर करतात.
पैसेवारी 50 पेक्षा कमी येण्याचे फायदे
ज्या गावाची पैसेवारी 50 पेक्षा कमी आली आहे आशा गावातील शेतकऱ्यांना सक्तीच्या कर्जवासुलीला सामोरे जावे लागत नाही.
त्या शेतकऱ्यांना सवलत दिली जाते व तसेच पीक विमा मिळवण्यास मदत होते.
या शेतकऱ्यांच्या मुलांची फिस माफ होऊ शकते.
नुकसान जास्त आणि पैसेवारी कमी
यंदाचा खरीप हंगाम तोट्याचा ठरला आहे शासनाच्या पैसेवारी काढण्याच्या प्रक्रियेतही ती 50 च्या खाली असल्याने त्याचे शिक्कामोर्तब झालाय.
आता शासनाने आर्थिक मदतीबरोबर कर्ज सवलत, वीज बिल सवलत, विद्यार्थ्याना फी माफी देण्याचे निर्णय घेण्याची मागणी केली जात आहे.
अधिक महितीसाठी येथे क्लिक करा