Crop Insurance प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात १५३ कोटी विमा रक्कम जमा करण्यात येत आहे त्यासाठी निधी वितरीत करण्यात आला आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२२ मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्याच्या माध्यमातून २ लाख ४८ हजार शेतकऱ्यांना १५३ कोटी रुपये नुकसानभरपाई रक्कमेचे वाटप करण्यात आले आहे.
संभाजीनगर जिल्ह्याला मिळालेल्या पिक विमा रक्कमेपैकी सर्वाधिक २३ टक्के हिस्सा म्हणजे ३५ कोटी ८२ लाख रुपये गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे
गेल्या खरीप हंगामात ७ लाख ४९ हजार १३६ शेतकऱ्यांना पिक विमा काढला होता यापैकी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याने २ लाख ४७ हजार ७२० शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईसाठी विमा कंपनीकडे अर्ज केला होता.
त्यासाठी एकूण १५३ कोटी ७२ लाख ६९ हजार ६१ रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना जून अखेरेस विमा कंपनीकडून वितरीत करण्यात आली आहे.
Crop Insurance शेतकऱ्यांच्या खात्यात १५३ कोटी विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या वर्षीची पेरणी करण्यास मोठा हातभार लागणार आहे.
यामध्ये सर्वाधिक ५० हजार ६९१ लाभधारक गंगापूर तर सर्वाधिक कमी ६ हजार ५० लाभधारक छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेतकरी असल्यासे आकडेवारी नुसार दिसून येते.
पिक कापणी प्रयोगाच्या आधारे मंडळनिहाय आकडेवारीच्या वरून नुकसानभरपाई झाल्याचे आढळून आल्यास अशा शेतकऱ्यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात विम्याद्वरे मिळू शकते.
गंगापूर तालुक्याला सर्वाधिक निधी
वैजापूर तालुक्यातून सर्वाधिक 1 लाख ८२ हजार ५७१ शेतकऱ्यांनी तर त्या खालोखाल कृषी मंत्र्याच्या सिल्लोड तालुक्यातील 1 लाख १७ हजार ८८७ शेतकऱ्यांनी पिक विमा काढला होता.
गंगापूर तालुक्यातील 1 लाख ११ हजार ८०५ शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले होते. वैजापूर तालुक्यातील ३३ हजार २९ शेतकऱ्यांना १९ कोटी ३३ लाख ६९ हजार रुपये निधी वितरीत करण्यात आला.
सिल्लोड तालुक्यातील ४८ हजार ७९६ शेतकऱ्यांना २६ कोटी ३४ लाख ६२ हजार रुपये तर गंगापूर तालुक्यातील ५० हजार ९१ शेतकऱ्यांना सर्वाधिक ३५ कोटी ८२ लाख ६३ हजार रुपये प्राप्त झाले.
जिल्ह्यातील आकडेवारी
तालुका | संरक्षित शेतकरी | विमा प्राप्त शेतकरी | रक्कम |
सिल्लोड | ११७८८७ | ४८७१६ | २६ कोटी, ३४, ६२,००० |
संभाजीनगर | ४४१८६ | ५०६० | ३ कोटी, ७२, ८५,००० |
कन्नड | १४३२८ | ३५१५३ | २१ कोटी, ९७, ९१,००० |
वैजापूर | १८२५७१ | ३३०२९ | १९ कोटी , ३३,६९,००० |
खुलताबाद | ४०८०० | १७२८१ | ८ कोटी, ११, ९१,००० |
गंगापूर | १११८०५ | ५०६९१ | ३५ कोटी, ८२, ६३,००० |
सोयगाव | ३९९७५ | १३७३० | १२ कोटी, ३८, १६,००० |
पैठण | ७६७६७ | २६११३ | १५ कोटी, ६०, २९,००० |
फुलंब्री | ४०८१७ | २६८७७ | १० कोटी, ४०,९८,००० |