25 takke vima list यावर्षी कमी झालेल्या पावसामुळे, शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच मोठा आर्थिक फटका बसला आहे.
या नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्य सरकार द्वारे प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 25 टक्के आगाऊ पीक विमा रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. 25 takke vima list
मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील पात्र असलेल्या 48 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा पिक विमा देण्यात येणार आहे. तर आठ मंडळांमध्ये कापूस पिक विमा देण्यात येणार आहे.
पिक विमा कंपनी द्वारे जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळांना 175 कोटी रुपयांचा पिक विमा वितरीत करण्यात येणार आहे. व या वितरणाचे काम दिवाळीपूर्वीच करण्यात येणार आहे.
जालना जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे बबनराव लोणीकर यांनी सांगितले आहे की, पिक विमा कंपनीने 48 मंडळांना सोयाबीन पिकांचा पिक विमा तर आठ मंडळांना कापूस पिकांचा पिक विमा देण्यास मंजुरी दिली आहे.
आता त्यानुसारच या भागातील शेतकऱ्यांना 25% आगाऊ पिक विमा देण्यात येणार आहे. सरकारद्वारे घेतलेल्या या निर्णयामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.