नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता अतिवृष्टी अनुदान २०२२ जे शेतकरी अतिवृष्टी अनुदानाच्या निकषात बसत नाही त्यांना देखील अनुदान मिळणार आहे.
म्हणजेच जे शेतकरी अतिवृष्टी अतिवृष्टी अनुदानासाठी पात्र नाही त्यांना देखील राज्य सरकार अनुदान देणार आहे.
या अनुदानसाठी जे शेतकरी पात्र नाही त्यांचे देखील अति पावसामुळे नुकसान झालेले आहे
परंतु त्या शेतकऱ्यांचे नाव अतिवृष्टी अनुदानांपासून वंचित होते.
आता मात्र अति पावसामुळे जारी शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असेल तर त्यांना सुद्धा अतिवृष्टी अनुदान मिळणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती खली जाणून घेऊया.
आणखी कामाची योजना महिला किसान योजना असा करा अर्ज
अतिवृष्टी अनुदान २०२२ निकषात न बसणाऱ्या शेतकारींना दिलासा
जून ते जुलै २०२२ पर्यंत राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे शेती पिकाच्या नुकसांनीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजरी देण्यात आली आहे.
याबाबत शासन निर्णय महसूल व वन विभागाने जिरी केला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती महाराष्ट्र शासनाच्या महासंवाद या अधिकृत संकेतस्थळार देखील प्रकाशित करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याबाबत मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करून जिल्ह्यांना निधी वितरित करण्यास सूचना दिल्या आहे.
त्याप्रमाणे आज मदत व पुनर्वसन विभागाने ७५५ कोटी 69 लाख 43 हजार रुपयांच्या निधीचे औरंगाबाद, अमरावती आणि पुणे विभागातील नऊ जिल्ह्यांना वितरण करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
विभागासाठी एवढा मिळणार निधी
एकूण ७५५ कोटी रु. पैकी औरंगाबाद विभागास 59754.03 लाख, अमरावती विभाग 5113.31 लाख, पुणे विभागास 10702.09 लाख इतका निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मंजूर करण्यात आला आहे.
जून ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत झालेल्या नुकसानीसाठी तीन हेक्टरच्या मर्यादेत जिरायती पिकांसाठी १३,६०० रूपये,
बागायत पिकांसाठी २७,००० रूपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी ३६,००० रूपये निधी वितरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना आता दिवाळीच्या शुभ माहुर्तवर ही मदत मिळणार असून शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.मागील काही दिवसामध्ये अति पासून पडला या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेतमालाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या अतिवृष्टीची पाहणी सुद्धा राज्याचे कृषि मंत्री सत्तार साहेब यांनी केली. या सर्व नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत दिली जाईल असे त्यांनी सांगितले.
Sangli distsathi anudan patr aahe ka
Ta.Ashti District .Wardha madhe Anudan pahije