कुक्कुटपालन योजना आता मिळेल ७५ टक्के सबसिडी करा अर्ज

मित्रांनो खूप शेतकरी मित्र हे शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन हा व्यवसाय करतात. किंवा बहुदा लोकांचा कुक्कुटपालन हाच primary व्यवसाय असतो. तुम्ही जर हा व्यवसाय करत असाल तर मग तुमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.आता कुक्कुटपालन योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला आता ७५ टक्के एवढी सबसिडी मिळणार आहे. शेतकरी बंधुंनो आता फक्त शेती करून उपयोग नाही तर आता तुम्हाला त्यासोबत एखादा जोडधंदा सुद्धा करावा लागेल. आता तुम्ही म्हणाल कि जोडधंदा करण्यासाठी भांडवल लागेल पैसे लागेल तर मित्रानो आता सरकार या व्यवसायांसाठी अनुदान देत असते.

त्यातीलच एक चांगला व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन तर हे कुक्कुटपालन करण्यसाठी ७५ टक्के एवढी सबसिडी देत आहे. तर या कुक्कुटपालन योजना साठी अर्ज कसा करायचा याची पूर्ण माहिती अहि खाली देलेली आहे. आणि सर्वात शेवटी व्हिडिओ सुद्धा दिलेला आहे.

आणखी कामाची योजना बांधकाम कामगार योजना मिळणार ५१ हजार अनुदान

कुक्कुटपालन योजना अर्ज करण्याची पद्धत

  • नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकरा pocra या वेबसाईटला भेट द्या
  • लॉगीन केल्यानंतर तुमच्या कॉम्प्युटरच्या डाव्या बाजूला विविध पर्याय दिसतील यापैकी नवीन योजनेसाठी अर्ज करा या लिंकवर क्लिक करा.
  • विविध योजना तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसेल त्यापैकी परसातील कुक्कुट पालन हि योजना तुम्हाला निवडायची आहे.
  • अर्जदार जर भूमिहीन असेल तर कुक्कुटपालन भूमिहीन व्यक्तींसाठी हि योजना निवडा.
  • योजना निवडल्यावर योजनेचे सर्व तपशील या ठिकाणी तुम्हाला दिसेल ते वाचून घ्या आणि अर्ज करा.
  • अर्ज्ज करतांना ८ अ खाता क्रमांक ७१२ सर्वे क्रमांक घटकासाठी वापरण्यात येणारे क्षेत्र हि संपूर्ण माहिती तुम्हाला या अर्जामध्ये भरावी लागणार आहे.
  • अनुदानाव्यतीरीक्त उर्वरित अर्जदार भागभांडवल अर्जदार कसे उभारणार आहेत त्या संदर्भातील तपशील देखील या ठिकाणी तुम्हाला निवडावे लागणार आहे. बँक किंवा स्वतः या दोन पर्यायांपैकी एक पर्याय या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करावा लागणार आहे.
  • सर्वात शेवटी स्वयंघोषणापत्र समोरील दिलेल्या चौकटीमध्ये टिक करून अर्ज्ज सबमिट करायचा आहे.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंट या बटनावर क्लिक करून अर्जाची प्रिंट काढून घा.

शेतकरी बंधुंनो तुम्हाला हि वरील माहिती वाचून कळाले नसेल तर मग खाली व्हिडिओ लिंक या बटनावर click करून व्हिडिओ बघा.

अशाच विविध शासकीय योजनांच्या महितीसाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा खलील ग्रुप लिंक ला टच करून

ग्रुप लिंक

Leave a comment