राशन कार्ड ऑनलाइन चेक चेक कसे करावे या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये मतदान, आधार किंवा पॅन कार्ड ही कागदपत्रे जेवढी आवश्यक असतात तेवढीच आवश्यकता आपल्याला राशन कार्डची सुद्धा आहे. तुमच्याकडे जर तुमचा राशन कार्डचा नंबर असेल तर अगदी तुमच्या मोबाईलवरून देखील तुमचे राशन कार्ड ऑनलाइन चेक करू शकता.
राशन कार्ड ऑनलाइन चेक करण्यासाठी तुमच्याकडे राशन कार्ड नंबर आवशयक.
राशन संदर्भातील ऑनलाईन बाबी चेक करण्यासाठी तुमच्याकडे तुमच्या राशन कार्डचा नंबर असेन आवश्यक आहे जो कि १२ अंकाचा असतो. जर तुमच्याकडे राशन कार्ड नंबर असेल तर तुम्ही अगदी काही मिनिटात तुमच्या राशन संदर्भातील संपूर्ण माहिती बघू शकता. परंतु जर तुमच्याकडे हा राशन कार्ड नंबर नसेल तर तो कसा बघावा कोठे शोधावा या संदर्भात पूर्ण माहिती खालील दिलेली आहे.
असा शोधा तुमचा राशन कार्ड नंबर जो कि १२ अंकाचा असतो.
• आपल्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोर उघडा.
• त्यात सर्च बारमध्ये टाईप करा मेरा राशन ॲप ( Mera rashan app )
• हे ॲप मोबाईलमध्ये इंस्टाल करा.
• ॲप्लीकेशनला ओपन केल्यानंतर Know your entitlement या बटनाला click करा.
• Know your entitlement या बटनाला टच करून सुद्धा राशन कार्ड नंबर दिसत नसेल तर . eligibility criteria बटनाला टच करा.
• या ठिकाणी तुम्हाला तुमच्या राशन कार्डचा नंबर दिसेल तो जतन करून ठेवा.
राशन कार्ड डाउनलोड खालील प्रमाणे
• आपल्या मोबाईल मधील वेब ब्राउजर उघडा.
• ब्राउजरच्या सर्च बारमध्ये rcms.mahafood.gov.in हा वेब ॲड्रेस टाका.
• National Food Security Program म्हणजेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रम हि वेबसाईट तुमच्या मोबाईलवर दिसेल.
• आपल्या वेब ब्राउजरच्या उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये दिसत असलेल्या तीन डॉटवर टच करा.
• आणि Desktop Site या पर्यायासामोरील चौकोनामध्ये टच करा.
• rashan card या पर्यायावर टच करा.
• Know your ration card या पर्यायावर टच करा.
• त्यानंतर दिलेल्या चौकटीमध्ये कॅपचा कोड टाईप करून verify या बटनाला टच करा.
• आणि आणखी एक चौकट तुम्हाला दिसेल यामध्ये तुम्हाला तुमच्या राशन कार्डचा बारा अंकी नंबर टाकायचा आहे आणि view report या बटनावर टच करायचे आहे.
• view report वर टच केल्यानंतर राशन कार्ड संबधित सर्व माहिती तुम्हाला दिसेल. या ठिकाणी print your ration card असा पर्याय दिसेल त्यावर टच करा.
• क़्यु आर कोड सहित संपूर्ण राशन कार्ड या ठिकाणी तुम्हाला दिसेल.
• हे राशन कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी सेव्ह या बटनावर टच करा.
• जसे हि तुम्ही सेव्ह या बटनावर टच कराल त्यावेळी हे राशन कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल. ते सेव्ह करून घ्या.
या प्रकारे तुम्ही तुमचे राशन कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता तसेच तुम्हाला तुमचा बारा अंकी राशन कार्ड क्रमांक माहित नसेल तर तो देखील माहित करू शकता.
आणखी हेही बघा कोरोना अनुदान मिळणार
मित्रांनो हा लेख वाचूनही तुम्हाला समजले नसेल तर खालील लिंक वर click करून त्यासंबंधी व्हिडिओ बघा