मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना उपक्रम

मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना
मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना

मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना विषयी माहिती करूया. मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना अंतर्गत फिरता पशु वैदकीय दवाखाना संदर्भात आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. शेतकरी बांधवांसाठी पशु संवर्धन विभागाच्या विविध योजना सुरु असतात. त्या योजनांची आपल्या शेतकरी बांधवांना किंवा जे शेतकरी दुग्धव्यवसाय करतात त्यांना या योजनेचा खूप फायदा होणार आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकरी बांधवांकडे गाई, म्हशी आणि शेळ्या असतात त्याचप्रमाणे शेती कामासाठी गुरे देखील असतात. तर शेतकरी आपल्या गुरांना आपल्या मुलांप्रमाणे जीव लावतात हि जनावरे आजारी पडली कि मग शेतकऱ्यांची खूप परवड होते त्यामुळे हा उपक्रम जाणून घेणे खूप महत्वाचे ठरणार आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्वाची ठरणार मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजना

महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या प्रभावी अमलबजावणीसाठी भारत फायनान्स इंक्लूजन लिमिटेड या कंपनीचे कॉल सेंटर देखील सुरु करण्यात आलेले आहेत. तुमच्याकडे शेळ्या, मेंढ्या, दुधाळ जनावरे किंवा इतर जनावरे असतील आणि ते आजारी पडले तर अशा वेळी तुम्ही १९६२ फोन करताच कमीत कमी वेळात पशुपालकांस दर्जेदार पशुवैदकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.


आणखी कामाची योजना पंतप्रधान आवास घरकुल योजना यादी बघा मोबाईलवर


दुग्धव्यवसाय करताय तर मग पशुस्वास्थ्य योजना कामची  

बेरोजगारीचे प्रमाण जास्त वाढल्यामुळे नोकऱ्या उपलब्ध नाहीत त्यामुळे अनेक तरुण शेळीपालन व्यवसाय, दुग्धव्यवसाय व शेतीपूरक व्यवसाय करतांना दिसत आहेत. शेळी पालन व्यवसाय किंवा दुग्धव्यवसाय करत असतांना सगळ्यात मोठी समस्या म्हणजे गुरांचे आजार हा आहे. दुग्धव्यवसाय किंवा शेळी पालन व्यवसाय करत असताना आजारामुळे एखादे जनावर दगावले तर शेतकरी बांधवांना खूप मोठे नुकसान होते. जवळ पशुवैद्यकीय असेल तर उत्तम पण जर दवाखाना नसेल तर मात्र शेतकऱ्याची खूप तारमळ  होते. त्यामुळे पशु संवर्धन विभागाची हि योजना शेतकऱ्यांसाठी खूप लाभदायक ठरणार आहे.

शेतकऱ्यांचा पशुऔषधी खर्च वाचणार

शेतकरी हा आपल्या जनावरांना आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे सांभाळत असतो. आणि जर या जनावरांना काही आजार झाल तर शेतकऱ्यांचा जीव कासवासा होतो. उपचारासाठी जनावरांना गावापासून दूर असलेल्या पशुवैदकीय दवाखान्यात घेवून जावे लागते. कधी तर खाजगी डॉक्टरांना घरी बोलवावे लागते अशा वेळी घरापर्यंत पशुवैदकीय सुविधा दिल्यामुळे शेतकरी बांधवांना जास्त खर्च करावा लागतो. मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेमुळे जनावरांवर होणारा जास्तीचा खर्च वाचणार असून मोफत  सुविधा मिळणार आहे.


आमचा whatsapp group


मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना या योजनेची संपूर्ण माहितीसाठी संपर्क साधा

मित्रांनो भरपूर जिल्ह्यामध्ये पशुस्वास्थ्य योजना सुरु झालेली आहे. परंतु काही जिल्ह्यांच्या काही तालुक्यामध्ये अजून देखील ह्या योजनाची अंबलबजावणी झाली नाही त्यामुळे तुम्ही ज्या तालुक्यातील असाल त्या तालुक्यामध्ये पशु संवर्धन विभागाची मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सुरु झाली आहे का या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी १९६२ या टोल फ्री नंबरवर फोन लावून विचारून घ्या आणि पशु संवर्धन योजनेचा लाभ घ्या.

Leave a comment