महाराष्ट्र ऑनलाइन भू नक्शा बघा स्वतः मोबाईलवर

शेतकरी मित्रांनो तुम्ही आता स्वतः तुमच्या शेताचा ऑनलाइन भू नक्शा तुमच्या मोबाईलवर बघू शकता. ते पण मोफत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि ऑनलाइन भू नक्शा बघायचा कस? ऑनलाइन भू नक्शा बघण्याचीच प्रोसेस मी आज तुमच्यासाठी खालील लेखात घेऊन आलेलो आहे. चला तर मग बघूया..

ऑनलाइन भू नक्शा कृती

  • मोबाईलच्या किंवा कॉम्प्युटरच्या ब्राउजरमध्ये टाईप करा भू नकाशा आणि सर्च करा
  • त्यानंतर mahabhunakasha या वेबसाईटची लिंक तुम्हाला दिसेल या लिंकवर क्लिक करा
  • जसे हि तुम्ही या ठिकाणी सर्च या बटनावर क्लिक कराल त्यावेळी भू नकाशा संदर्भातील शासनाच्या अधिकृत वेबसाईट या ठीकानीज ओपन होईल.
  • कॉम्प्युटर आणि मोबाईलवर या वेबसाईटचा इंटरफेस जरी वेगवेगळा दिसत असला तरी जि माहिती या ठिकाणी तुम्हाला भरावयाची आहे ती सारखीच आहे म्हणजेच पर्याय या ठिकाणी सारखेच आहेत त्यमुळे हा लेख वाचल्यानंतर मोबाईल आणि कॉम्प्युटरवर तुम्ही हा भू नकाशा बघू शकता. तुम्ही हि प्रक्रिया तुमच्या कॉम्प्युटरवर करत आहात असे गृहीत धरुयात…आता तुमच्या कॉम्प्युटरच्या डाव्या बाजूला स्क्रीनवर State, Category, District, Taluka, Village,Map, Type, असे एकूण 7 पर्याय दिसेल. स्टेटमध्ये महाराष्ट्र अगोदरच सिलेक्टेड असेल, त्यानंतर कॅटेगरी मध्ये rural निवडा, District मध्ये तुमचा जो हि जिल्हा असेल तो निवडा.
  • त्यानंतर खाली Search by plot No. असा एक पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसेल. चौकटीमध्ये तुम्हाला तुमचा गट नंबर टाकायचा आहे. आणि सर्च या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • ऑनलाइन भू नक्शा  बघण्यासाठी Map Report या बटनावर क्लिक करा.
  • जसे हि तुम्ही Map Report या बटनावर क्लिक कराल त्यानंतर दुसरे tab या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी तुमच्या जमिनीचा नकाशा तुम्हाला दिसेल.
  • या ठिकाणी single plot आणि All plots of same owner असे दोन पर्याय दिसतील. या पैकी जो पर्याय तुम्हाला योग्य वाटत असेल तो निवडा यानंतर या ठिकाणी एक झाडाचे म्हणजेच लेअरचे चिन्ह तुम्हाला दिसेल यावर क्लिक करताच तुमच्या गट नंबरच्या आजूबाजूला जे झाडे आहेत ते दिसतील त्यासाठी झाडाच्या चिन्हावर क्लिक करा.
  • all लेअरवर क्लिक करताच सर्व बाबी या ठिकाणी तुम्हाला दिसतील त्यासाठी show pdf Report या बटनावर क्लिक करा.
  • तर अशाप्रकारे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जमिनीचा नकाशा दिसेल ह्या नकाशाची प्रिंट काढायची असल्यास प्रिंट या बटनावर क्लिक करा तुम्हाला हा नकाशा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये pdf स्वरुपात हवा असेल तर folder या बटनावर क्लिक करा.
  • अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ बघा

आणखी कामाची योजना शेतकरी ट्रॅक्टर योजना अनुदान नवीन GR

Leave a comment