मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मित्रांनो आपल्या राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाकडून नवीन तीन बांधकाम कामगार योजना सुरु केल्या आहे याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या महासंवाद या वेबसाईट वर दिली आहे.
बांधकाम कामगार योजना पूर्वी पासून मिळत असणाऱ्या योजना
- कामगार आजारी पडला किंवा बांधकाम कामगाराची पत्नी बाळंतीण झाली तर अशावेळी देखील महाराष्ट्र कामगार मंडळाकडून आर्थिक सहाय्य दिले जाते.
- बांधकाम कामगारांच्या मुला किंवा मुलीकरिता इयत्ता १ पासून पदव्युत्तर शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य.
- ज्या भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे त्या भागामध्ये त्या भागातील कामगारांना मध्यान्ह भोजनासह रात्रीचे भोजन देखील पुरविले जाते.
- कामगारांचा मुलगा जर अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण घेत असेल तर त्यासाठी विशेष सहाय्य केले जाते.
- बांधकाम कामगारांना सुरक्षा संच म्हणजेच safety kit दिली जाते.
- बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो म्हणजेच घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
Also Read This फळबाग लागवड अनुदान मिळणार बघा जी आर
नवीन बांधकाम कामगार योजना
- काम करत असतांना बांधकाम कामगारांचा हात किंवा पाय निकामी झाला तर त्या बांधकाम कामगारास अर्थसहाय्य दिले जाणार आहे.
- बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहाकरीता ५१००० रुपये अनुदान देण्यात येईल.
- जर बांधकाम कामगाराचा अपघाताने किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तर अशावेळी त्याचे पार्थिव मूळ गावी पाठविण्यासाठी वाहतुकीचा खर्च महाराष्ट्र कामगार मंडळ करणार आहे.
वरील तीन कामगार योजना आता नवीन नमूद करण्यात आल्या या योजनांचा फायदा कामगारांना होणार आहे.