जॉब कार्ड करा डाउनलोड स्वतः तुमच्या मोबाईल वर

मित्रांनो ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत कामाची माहिती आहे. तुम्हाला रोजगार हमी योजना तर माहीतच असेल तर या योजनेसाठी एक महत्वाचा दस्तावेज म्हणजे जॉब कार्ड. तर हेच कार्ड तुम्ही स्वतः अगदी काही मिनिटात तुमच्या मोबईल मध्ये डाउनलोड करू शकता. ते कसा डाउनलोड करायचं याची पूर्ण माहित आपण खाली बघणार आहोत.

जॉब कार्ड विषयी थोडी माहिती

मनरेगा अंतर्गत काम करण्यास इच्छुक पात्र आणि अकुशल लोकांना हे कार्ड दिले जातात. जर तुमचे जॉब कार्ड अजून तयार झाले नसेल तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला विहित नोंदणी फॉर्म भरावा लागेल आणि कागदपत्रांसह ग्रामपंचायत कार्यालयात सादर करावा लागेल. यानंतर, तुमचा अर्ज तपासल्यानंतर, जर ते योग्य आढळले तर तुम्हाला 30 दिवसात मनरेगा जॉब कार्ड मिळेल.

आमच्याशी कनेक्ट व्हा.

जाणून घेऊया कार्ड डाउनलोड करण्याची पद्धत

  • कॉम्पुटर किंवा मोबाईलच्या ब्राउजरमधील गुगल सर्च बारमध्ये टाईप करा https://nrega.nic.in/netnrega/home.aspx
  • तुमच्या मोबाईलच्या किंवा कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे वेबसाईट ओपन होईल.
  • वेबसाईटच्या नेव्हिगेशन बारवरील Panchayats/ GP/ PS / ZP या टॅबवर क्लिक करा.
  • Gram panchayats, Panchayat samiti/ Block panchayat / Mandal  असे पर्याय दिसतील त्यापैकी Gram panchayats या पर्यायावर क्लिक करा.
  • पुढच्या स्टेपला अनेक पर्याय दिसतील त्यापैकी Generate Report या पर्यायावर क्लिक करा.
  • भारतातील काही राज्ये या ठिकाणी दिसतील त्यापैकी Maharashtra या लिंकला क्लिक करा.
  • त्यानंतर ज्या वर्षाचा रिपोर्ट्स बघायचा असेल ते वर्ष निवडा. जिल्हा, तालुका व गाव निवडा.
  • R1 जॉब कार्ड रजिस्ट्रेशन अनेक पर्याय दिसतील त्यापैकी Print issue job card यावर क्लिक करा.
  • Whole panchayat, whole village, individual असे पर्याय या ठिकाणी दिसतील त्यापैकी individual या पर्यायावर क्लिक करा किंवा टच करा.
  • गाव आणि तुमचे किंवा ज्या व्यक्तीचे जॉब कार्ड प्रिंट करायचे आहे त्या व्यक्तीचे नाव दिलेल्या नावांच्या यादीमधून निवडा.
  • प्रिंट कशी हवी आहे या करिता तीन पर्याय दिसतील त्यापैकी ज्या पद्धतीची प्रिंट तुम्हाला हवी आहे त्या पर्यायावर क्लिक करा
  • कॉम्प्युटरवर कंट्रोल पी कमांड देऊन प्रिंट काढा किंवा कॉम्प्युटरला प्रिंटर जोडलेला नसेल तर pdf मध्ये सेव्ह करून घ्या.

मित्रांनो तुम्हाला हा लेख वाचून पूर्णपणे कळले नसेल तर आम्ही खाली व्हिडिओ ची लिंक दिली आहे त्या लिंक वर टच करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता.

Leave a comment