नमस्कार शेतकरी बंधुंनो तुम्हाला तर माहितीच असेल कि शेतीविषयी कोणतेही काम असो किंवा शितीविषयक योजना असो प्रत्येकाला आपल्या शेतीचा सातबारा उतारा हा बहुदा आवश्यक असतो. आता सातबारा काढायचा म्हंटल्यावर तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात.
मित्रांनो आता सातबारा काढण्यासाठी तुम्हाला कार्यालयाला जाण्याची गरज नाही तुम्ही आता घरबसल्या digital 7/12 आपल्या मोबाईलवरून डाउनलोड करू शकता त्याचीच माहिती आपण बघणार आहोत.
digital 7/12 काढण्याची पद्धत खालीलप्रमाणे
- सर्वात आधी अधिकारीक सरकारी वेबसाईट https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/ यावर जावे.
- आपण जर पहिल्यांदा सातबारा घेत असाल तर OTP Based Login वर Click करून आपल्या जवळ असलेला फोन नंबर टाकावा व Send OTP वर क्लिक करावे.
- आता आपल्या नंबर वर एक OTP प्राप्त होईल तो दिलेल्या रकान्यात योग्यप्रकारे भरावा व Verify OTP वर क्लिक करावे.
- आपल्या समोर आता एक फॉर्म दिसेल त्यात आपल्याला हव्या त्या ठिकाणाचा पत्ता भरावा लागतो, येथे आपला जिल्हा, तालुका, गाव, निवडा.
- हे झाल्यावर आपल्या जमिनीचा गट नंबर टाकायचा आहे व त्यातील सर्वे नंबर सुध्दा टाकायचा आहे.
- सातबारा उतारा मिळवण्यासाठी 15 रुपये भरावे लागतात त्यासाठी Recharge बटन वर क्लिक करायचे आहे.
- एका सातबारा साठी 15 रुपये फी आहे, त्यानुसार आपण Payment करायचे आहे, आपल्याला योग्य ती पेमेंट पद्धत निवडून येथे पैसे भरा.
- पैसे भरल्यावर सातबारा डाउनलोड साठी तयार होईल मग तुम्ही येथून डाउनलोड करून घ्यावा
जुन्या हस्तलिखित सातबाऱ्याचा नमुना व अर्ज डाउनलोड करा
डिजिटल सातबारा मध्ये काही चूक झाली असेल आणि ती चूक दुरुस्त करण्यासाठी किंवा असे म्हणूयात सातबारा नाव दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयामध्ये एक अर्ज करावा लागतो तो अर्ज तुम्हाला तहसील कार्यालयात जमा करावा लागतो. थोडेफार शुल्क भरून तुम्हाला तुमचा जुना हस्तलिखित सातबारा मिळतो आणि हा सातबारा मिळाल्यावर तुम्ही तलाठी यांच्याकडे नाव दुरुस्ती असेल किंवा सातबाऱ्यावर चूक झाली असेल तर ती सुधारण्यासाठी अर्ज करू शकता.
जुना हस्तलिखित सातबारा नमुना बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
मित्रांनो तुम्हाला हा वरील लेख वाचून सुद्धा कळले नसेल तर काही हरकत नाही तुम्ही खालील व्हिडिओ लिंक वर क्लिक करून यासंबंधी व्हिडिओ बघू शकता
सातबारा ऑनलाईन दुरुस्तीसाठी खालील लेख वाचा
शेतकरी बंधुनो तुम्हाला विविध शासकीय अनुदान योजनांची माहिती हवी असेल तर खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रूप मध्ये साम्हील व्हा.
येथे क्लिक करा शेतकरी ग्रुप मध्ये सहभागी व्हा शेती संबधित योजनांची माहिती मिळवा.