आपण आज गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये शेतकऱ्यांना कोणत्या गोष्टीसाठी कोणत्या परिस्थितीत किती विमा सरकारकडून मिळणार आहे, तसेच कोणत्या कारणास्तव विमा दिला जाणार आहे. तसेच कधी विम्याचा लाभ घेता येणार नाही. विम्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे ,पात्रता , मिळणारी रक्कम आणि लागू असणाऱ्या अटी , शासन निर्णय कोणत्या कारणास्तव लाभ मिळणार, अर्ज कुठे करायचा , कोणत्या विमा कंपनी द्वारे विमा मिळेल यांची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात कोणत्या अपघात बाबीवर किती विमा वितरित करतात?
- जर अपघातामध्ये शेतकऱ्याचा एक अवयव किंवा एक डोळा निकामी झाला असेल, तर त्याला १ लाख विमा दिला जाईल.
- जर शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला असेल तर या कारणास्तव त्याला २ लाख एवढा विमा त्याच्या कुटुंबाला दिला जाईल.
- शेतकऱ्याला दोन डोळे किंवा दोन अवयव गमवावे लागले, तर त्याला १ लाख एवढा विमा देण्यात येईल.
- अंगावर वीज पडून मृत्यू येणे.
- नैसर्गिक आपत्ती.
- पूर.
- सर्पदंश.
- विंचूदंश.
- विजेचा शॉक लागून मृत्यू.
अश्या वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकऱ्याला अपंगत्व किंवा मृत्यू ओढवला जातो. आणि शेतकरी कुटुंबाचा आधार जातो. अशा कुटुंबाना या योजनेअंर्तगत विमा स्वरूपात आर्थिक मदत मिळते. ही मदत २ लाख रुपये पर्यंत मिळू शकते. अपघात कशा मुळे आणि कोणत्या स्वरूपाचा असेल यानुसार विमा रक्कम मंजूर होते.
विहीत नमुन्यातील पूर्वसुचनेचा अर्ज पूर्वसूचनेसोबत आवश्यक कागदपत्रे
- मृत्यू दाखला
- 7/12 उतारा
- प्रथम माहिती अहवाल
- विजेचा धक्का अपघात, वीज पडून मृत्यू, पाण्यामध्ये बुडून मृत्यू. उंचावरून पडून झालेला मृत्यू, सर्पदंश/विंचू दंश व अन्य कोणतेही अपघात यासाठी प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल
- घटनास्थळ पंचनामा
- वयाचा दाखला
दावा अर्जासोबत सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे:-
A ) लाभ घेण्याकरीता दावा दाखल करताना सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे –
- विहीत नमुन्यातील अर्ज अर्जासोबत प्रस्तावासाठी अपघाताच्या प्रकारानुसार आवश्यक सर्व कागदपत्रे सहपत्रित करण्यात यावी.अप्राप्त कागदपत्रांची यादी त्रुटीपत्रकात तालुका कृषि अधिकारी कार्यालयात नोंदवहीत, संगणक प्रणालीमध्ये पडताळणी करून नोंदवण्यात यावी.
- अपघातग्रस्ताच्या वयाच्या पडताळणीकरीता जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र/ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र किंवा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा वाहन चालविण्याचा परवाना किंवा पारपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र किंवा उपलब्ध नसल्यास निवडणूक ओळखपत्र (स्वयंसाक्षाकीत केलेले).
- अपघातग्रस्त नोंदणीकृत खातेदाराच्या वयासंबंधी वरीलपैकी कोणताही पुरावा उपलब्ध होऊ न शकल्यास विमा दावेदाराने/कुटुंबातील सदस्याने अपघातग्रस्त खातेदाराच्या वयासंबंधी शपथपत्र दिल्यास असे शपथपत्र ग्राहय धरण्यात येईल.
- खातेदार शेतकरी कुटुंबाची शिधापत्रिका राजपत्रित अधिकारी यांनी साक्षांकित केलेली प्रत.
- शेतकरी म्हणून त्याचे नावाचा समावेश असलेला 7/12 उतारा किंवा ८-अ नमुन्यातील मुळ उतारा.
- मृत्युचा दाखला स्वयंसाक्षांकित केलेली प्रत.
- घटनास्थळ पंचनामा स्वयंसांक्षाकीत केलेली प्रत.
प्रस्ताव प्राप्त झाल्यावर पडताळणी करतांना तालुका कृषि अधिकारी कार्यालय स्तरावर मुळ कागदपत्रे तपासून सदर प्रमाणपत्रे सांक्षाकीत करावीत.
शेतकरी ग्रुप मध्ये सहभागी व्हा शेती संबधित योजनांची माहिती मिळवा.
B) प्रस्तावासोबत सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे:-
- ज्या नोंदीवरुन अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नाव ७/१२ वर आले असेल अशी सबंधीत फेरफार नोंद (गाव नमुना नंबर ६-ड) मुळ उतारा अथवा फेरफार नोंदीबाबत सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र
- शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गांव नमुना नं. ६ क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद. मुळ उतारा अथवा वारसाच्या नोंदीबाबत सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र
- विहीत नमुन्यातील कार्यकारी दंडाधिकारी यांचे समोर केलेले प्रतिज्ञापत्र (प्रपत्र-ग)
- या शिवाय अपघाताच्या घटनेच्या स्वरूपानुसार पुराव्यादाखल सादर करावयाच्या प्रपत्र क मधील कागदपत्रे
विमा दाव्याचे अनुषंगाने पूर्वसुचना अर्ज विहित कागदपत्रांसह ज्या दिनांकास तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दाखल /प्राप्त होईल व संगणक प्रणालीमध्ये अपलोड होईल त्या दिनांकासच तो विमा कंपनीस प्राप्त झाला आहे असे समजण्यात येईल.
शिवाय योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्यानंतर ९० दिवसांपर्यंत संगणक प्रणालीमध्ये नोंद झालेल्या पूर्वसुवना अर्जान्वये तालुका कृषि अधिकारी यांचेकडे प्राप्त होणारे विमा प्रस्तावसुद्धा विमा पॉलिसीचा कालावधी संपल्याच्या दिवसापासुन ३६५ दिवसांपर्यंत स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील, मात्र सदर कालावधीनंतर कोणताही प्रस्ताव स्विकारला जाणार नाही, तसेच यासंदर्भात ग्राहक मंच किंवा इतर निर्णय/आदेश शासनावर बंधनकारक राहणार नाहीत.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आर कोठे व कसा करायचा
जर तुमच्या कुंटुंबात जर असा अपघात झाला असेल तर तुम्हाला वरी दिलेले अर्ज डाउनलोड करून तो अर्ज भरून या कागदपत्रा सह तुमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या कडे जमा करावा लागेल.
- विमा प्रस्ताव विहित कागदपत्रांसह योजनेअंतर्गत विमा संरक्षित कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे तसेच योजनेच्या अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातांसाठी योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्या नंतर 90 दिवसां पर्यंत तालुका कृषी अधिकारी यांचेकडे प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील.
- शिवाय योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्या नंतर 90 दिवसां पर्यंत संगणक प्रणाली मध्ये नोंद झालेल्या पुर्व सुचना अर्जान्वये तालुका कृषी अधिकारी यांचे कडे प्राप्त होणारे विमा प्रस्तावसुद्धा विमा पॉलिसी चा कालावधी संपल्याच्या दिवसापासून 365 दिवसां पर्यंत स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील.
- मात्र सदर कालावधी नंतर कोणताही प्रस्ताव स्विकारला जाणार नाही. तसेच या संदर्भात ग्राहक मंच किंवा इतर निर्णय/आदेश शासनावर बंधनकारक राहणार नाहीत.
मित्रांनो तुम्हाला वरील माहिती वाचून तुम्हाला व्यवस्थित माहिती समजली नसेल तर सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडिओ लिंक ला क्लिक करून व्हिडिओ बघा.