आज आपण कडबा कुट्टी मशीन योजना विषयी माहिती जाणून घेणार आहोत. बहुदा सर्वच शेतकरी वर्गाकडे जनावरे हि असतात. ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाई, म्हशी, शेळ्या किंवा शेतीसाठी जनावरे शेतकऱ्यांना पाळावी लागतात.
या जनावरांना चार तर लागतोच आणि कधी कधी त्यांच्या चार्याची तारमळ सुद्धा होते. जनावरांच्या चाऱ्याची कमतरता भासू नये म्हणून शेतकरी ह्या चाऱ्याची कुट्टी करून ठेवत असतो. यामुळे चाऱ्याची वेस्टेज म्हणजे उष्टाळ कमी पडते. आणि यामुळे चाऱ्याची पंचायत होत नाही.
कडबा कुट्टी मशीन योजना फायदे
- चाऱ्याची साठवणूक कमीत कमी जागेत होते.
- चारा बारीक केल्याने जनावरांना पचवण्यात खाण्यास सोपा जातो.
- कडबा कुट्टी मशीनला विद्युत मोटर जोडली असल्याने चारा कापण्यासाठी खूप कमी वेळ लागतो.
आता जाणून घेऊया कडबा कुट्टी मशीन साठी अर्ज करण्याची पद्धत
कडबा कुट्टी मशीन योजना अर्ज करण्यसाठी खालील पद्धतीचा अवलंब करा
- सर्वात अगोदर mahadbt वेब पोर्टलवर जा.
- युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगीन करा.
- तुमच्याकडे युजर आयडी पासवर्ड नसेल तर अगोदर नोंदणी करून घ्या.
नोंदणीसाठी येथे क्लिक करा.
- लॉगीन केल्यावर अर्ज करा असे अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
- कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावर क्लिक करा.
- जसे हि तुम्ही कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावर क्लिक कराल त्यावेळी एक अर्ज तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर ओपन होईल त्यामध्ये खालीलप्रमाणे माहिती निवडायची आहे.
- मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा.
- तपशील या पर्यायाखालील तपशिलामध्ये मनुष्यचलित अवजारे हा पर्याय निवडा.
- व्हील ड्राईव्ह प्रकार आणि एच पी श्रेणीमध्ये काही पर्याय निवडायचा नाही.
- यंत्र सामग्री अवजारे या पर्यायासाठी फॉरेज ग्रास ॲण्ड स्ट्रा हा पर्याय निवडा.
- प्रकल्प खर्च श्रेणी रिकामी सोडा.
- सर्वात शेवटी मशीनच्या प्रकारामध्ये Above 3 व upto 3 असे पर्याय दिसेल त्यापैकी एक पर्याय निवडा आणि अर्ज जतन करा या बटनावर क्लिक करा.
अशा प्रकारे तुम्ही वरील पद्धतीचा अवलंब करून हा अर्ज करू शकता.
तुम्हाला वरील माहिती वाचून तुम्हाला समजण्यात काही अडचण येत असेल तर खालील व्हिडिओ लिंक वर टच करून या योजनेसंबंधी व्हिडिओ बघू शकता.
अशाच विविध शासकीय योजनाच्या माहितीसाठी आमच्याशी कनेक्ट व्हा. आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा खालील लिंक वर टच करून.
ग्रुप लिंक शेतकरी ग्रुप मध्ये सहभागी व्हा शेती संबधित योजनांची माहिती मिळवा.