अर्थसंकल्प 2022-23
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता 2022-23 यावर्षी शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान प्रोत्साहनपर दिले जाणार आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा
- नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता 2022-23 यावर्षी 50 हजार रुपये अनुदान प्रोत्साहनपर दिले जाणार आहे.
- कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला 50 कोटींचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली.
- हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पीय भाषणात केली आहे.
- शेतकऱ्यांना शेततळे योजनेसाठी 50 हजार एवेजी ते वाढवून आता 75 हजार रुपये अनुदान मिळणार आहेत
- पंतप्रधान सिंचन योजनेतून 11 प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
- दोन वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.
- देशी गाई, बैलांची उत्पादकता वाढवण्यासाठी राज्यात तीन मोबाइल प्रयोगशाळा उभारणार.
- जलसंपदा विभागाला 13 हजार 252 कोटी रुपयांच्या निधीची तरतदू यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
- त्याशिवाय गोसीखुर्द प्रकल्पासाठीच्या कामासाठी निधीची तरतूद करण्यात आली.
- या वर्षात 60 हजार कृषीपंपाना वीज देणार.
- शेततळ्या साठीच्या अनुदानात वाढ करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे
शिक्षणक्षेत्रासाठी अर्थसंकल्पामध्ये घोषणा
उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी 1160 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे तर शालेय शिक्षण विभागासाठी 2354 कोटींच्या निधीची तरतूद करण्याची घोषणा केली आहे.
- क्रीडा विभागासाठी 354 कोटींच्या निधीची तरतूद
- उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी 1160 कोटींच्या निधीची तरतूद
- मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला 10 कोटींचा निधी
- शालेय शिक्षण विभागासाठी 2354 कोटींच्या निधीची तरतूद
- सांस्कृतिक विभागासाठी 193 कोटींच्या निधीची तरतूद
राज्याच्या अर्थसंकल्पामधील दहा महत्वाच्या घोषणा!
- मुंबई प्रमाणे राज्यात एसआरएसाठी 100 कोटी रुपयांचा निधी
- राज्यातील 16 जिल्ह्यात प्रत्येकी 100 खाटांचे स्त्री रोग रुग्णालय.
- राज्यात रस्ते बांधण्यासाठी 15 हजार 773 कोटी रुपये.
- जलसंपदा विभागासाठी 13252 कोटींचा निधी.
- आंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मोबाईल सेवा.
- आरोग्य विभागासाठी 11 हजार कोटींची भरीव तरतूद.
- महिला शेतकऱ्यांसाठीची 30 टक्केची तरतूद वाढवून 50 टक्के केली.
- मागासवर्ग समर्पित आयोग स्थापन करणार.
- एसटी महामंडळ 3 हजार नवीन बस देणार आहेत.
- तृतीय पंथीयांना स्वतंत्र ओळखपत्र आणि रेशन कार्ड.
वरील माहिती हि महाराष्ट्र शासनाच्या महासंवाद या शासकीय वेबसाईट वर प्रकाशित केलेली आहे.
विविध शासकीय योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
ग्रुप लिंक शेतकरी ग्रुप मध्ये सहभागी व्हा शेती संबधित योजनांची माहिती मिळवा.