मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना GR नवीन जी. आर आलेला असून या जी आर संबंधी आज आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहेत.
ग्रामीण भागात शेती हा मुख्य व्यवसाय असतो पण शेतीसोबतच बरेच शेतकरी आता जोडधंदा म्हणून शेळीपालन ,कुक्कुटपालन आणि दुग्धव्यवसाय असे व्यवसाय करत असतात. आणि आता आगामी काळात जनावरांना खूप प्रकारचे रोगराई होत असते. यामुळे जनावरे खूप प्रमाणात आजारी पडतात आणि हि जनावरे आजारी पडली कि आपल्या व्यवसायावर परिणाम होतो.
मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना GR
शेतीसोबतच जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करण्यासाठी शेतकरी बांधव मोठी रक्कम भरून दुध देणारी जनावरे खरेदी करत असतात. अशावेळी या जनावरांचे आरोग्य बिघडले तर दुग्धव्यवसायावर तर खूप मोठा परिणाम होईलच आणि शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होऊ शकते.
जनावरे जर आजारी पडले आणि तुमच्या गावामध्ये पशुरुग्णालय नसेल तर अशा वेळी तालुक्याच्या ठिकाणी जनावरांना घेवून जाण्याशिवाय पर्याय राहत नाही.
मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेचा हेतू
या योजने अंतर्गत ज्या गावांमध्ये दळणवळणाची साधने उपलब्ध होत नाहीत त्या गावामध्ये फिरत्या पशुचिकित्सा पथकाद्वारे आजारी जनावरांवर उपचार करणे हा या योजनेचा हेतू होता.
फिरते पशुचिकित्सालय म्हणजे पशुवैद्कीय अधिकारी आणि त्यांना आवश्यक असणारे समान घेवून हि गाडी अशा ग्रामीण भागामध्ये जाते ज्या ठिकाणी दळणवळणाची साधने उपलब्ध नाहीत किंवा शेतकरी त्यांचे आजारी जनावरे घेवून मोठ्या शहरामध्ये किंवा गावांमध्ये पोहचू शकत नाहीत.
मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना GR माहिती
फिरत्या पशुचिकित्सा पथकांना एखादा तालुका नेमून दिला असेल आणि त्याच तालुक्याला लागून एखादे गाव असेल म्हणजेच त्या गावाचे अंतर कमी असेल मात्र ते या पथकांकडे नसेल तर अशावेळी अंतर जवळ असून देखील अशा गावातील शेतकऱ्यांना हि सेवा दिली जात नव्हती.
मात्र आता जिल्ह्यांच्या प्रशासकीय सीमांचा विचार न करता भौगोलिक सलगता विचारात घेवून फिरत्या पशुचिकित्सा पथकांना जे जिल्हे नेमून दिलेले आहेत त्या जिल्ह्याच्या नजीकच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
शासनाचा जी आर बघण्यासाठी खालील जी आर बघा या लिंक वर क्लिक करा.
मित्रांनो या योजनेचा लाभ कसा घ्यायचा पूर्ण माहितीसाठी खालील लिंक वर टच करा.
येथे टच करा मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना उपक्रम
खालील प्रमाणे काम करते हि योजना
या योजनेचा लाभ घेण्यासाठी १९६२ या टोल फ्री नंबरवर फोन करावा लागतो. त्यानंतर हि योजना जर तुमच्या तालुक्यामध्ये सुरु असेल तर फिरते पशुचिकित्सा पथक तुमच्या घरी येते आणि तुमच्या आजारी जनावरांचे उपचार करते.
तुमच्या जिल्ह्यामध्ये हि योजना सुरु आहे किंवा नाही हे देखील तुम्ही १९६२ या टोल फ्री नंबरवर फोन करून विचारू शकता.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ बघा
अशाच नवनवीन योजनाच्या माहितीसाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
ग्रुप मध्ये सामील व्हा शेतकरी ग्रुप मध्ये सहभागी व्हा शेती संबधित योजनांची माहिती मिळवा.