आज आपण या लेखामध्ये पाणंद शेत रस्ता या योजनेची माहिती घेणार आहोत. शासनाने काही दिवसापूर्वीच मातोश्री पाणंद रस्ता योजना अंतर्गत शेतात जाण्यासाठी देण्याचा जी आर आला होता. आणि आता शासन शेतकऱ्यांना महाराजस्व अभियान जेसीबी सुद्धा मिळणार आहे यासंबंधी माहीती आपण आज जाणून घेऊया.
ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्त्यांची खूप अडचण असते आणि या अडचणीमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होते. शेतात जाण्यासाठी रस्ता नसला कि वेळेवर मला बाहेर काढल्या जात नाही आणि मग यामुळे मालाला व्यवस्थित भाव मिळत नाही.
शेतकऱ्यांना या अडचणींना आता सामोरे जावे लागणार नाही यासाठी शासनाने काही दिवसापूर्वी मातोश्री पाणंद रस्ता योजना यासंबंधी जी आर काढला होता जी आर बघण्यासाठी खालील लिंक वर टच करा.
मातोश्री पाणंद रस्ता योजना जी आर
पाणंद शेत रस्ता योजना महाराजस्व अभियान
तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता निर्माण करायचा असेल किंवा आहे तो रस्ता दुरुस्त करायचा असेल. अशावेळी महाराजस्व अभियानांतर्गत शेतकऱ्यांना रस्ता निर्मितीसाठी जेसीबी उपलब्ध करून दिला जातो.
जेसीबी आमचा डीझेल तुमचे या योजनेप्रमाणे हि योजना राबविली जाणार आहे.
कशी काम करते हि योजना
महाराजस्व अभियानांतर्गत शेतात जाण्यासाठी रस्ता निर्मितीसाठी तहसील कार्यालयाकडून जेसीबी दिला जातो. ज्या ठिकाणहून हा रस्ता जाणार आहे त्या रस्त्या लगतच्या शेतकऱ्यांचे ना हरकत प्रमाणपत्र यासाठी लागते.
एकदा का हे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले कि मग पुढील कार्यवाही अगदी सोपी होते. या योजनेची कार्यवाही खालीलप्रमाणे केली जाते.
योजनेची कार्यवाही खालील प्रमाणे असते.
- ज्या शेतात शेत रस्ता हवा असेल त्या संबधित शेतकऱ्यांनी तलाठी किंवा तहसील कार्यालयाकडे अर्ज सादर करावा.
- अर्ज सादर केल्यानंतर तलाठी रस्त्या संदर्भातील अहवाल तहसील कार्यालयाकडे जमा करतात.
- सर्व बाबींची शहानिशा केल्यानंतर मग शेत पाणंद रस्त्यासाठी तहसील कार्यालयाकडून जेसीबी उपलब्ध करून दिला जातो.
अशा प्रकारे हि योजना काम करते तुम्हाला सुद्धा शेतात जाण्यासाठी रस्ता नसेल तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
विविध शासकीय योजनांची माहिती मिळावा अगदी काही मिनिटात तुमच्या मोबाईलवर या साठी खालील लिंक वर टच करा.
योजनांची माहिती मिळावा शेतकरी ग्रुप मध्ये सहभागी व्हा शेती संबधित योजनांची माहिती मिळवा.