विहीर मोटार अनुदान योजना असा करा ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो बहुतेक सर्वच शेतकरी बांधवांच्या शेतात विहीर असतेच आणि विहीरीचे पाणी शेतीमलाला देण्यासाठी मोटार आवश्यकच असते. तर मित्रांनो आता तुम्हाला विहीर मोटार अनुदान योजना या योजनेअंतर्गत सर्व शेतकरी बांधवांना अनुदान दिले जाते. या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.  

ही योजना आपल्या शेतकरी मित्रांसाठी खूप महत्वाची ठरणार आहे. या योजनेसाठी काय पात्रता आहे व योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात या विषयीची पूर्ण माहिती आपण आज या लेखामद्धे घेणार आहोत.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2022

विहीर मोटार अनुदान योजना ऑनलाईन अर्ज पद्धत

  • https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login हा web address सर्च केल्यानंतर तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर महाडीबीटी शेतकरी पोर्टल ओपन होईल.
  • तुमचा युजर आयडी, पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉगइन करा.
  • आधार नंबरला लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर  otp घेवून देखील तुम्ही लॉगइन करू शकता.
  • लॉगइन केल्यावर अर्ज करा असे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
  • सिंचन साधने व सुविधा या ऑप्शनवर क्लिक करा.
  • तुमचा तालुका गाव आणि सर्व्हे क्रमांक या संदर्भातील संपूर्ण माहिती अगोरच तुम्हाला या ठिकाणी दिसेल जर हि माहिती दिसली नाही तर मन्युअलि टाका.
  • मुख्य घटक या पर्यायासाठी सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडा.
  • बाबीमध्ये पंपसेट इंजिन व मोटर या पर्याय निवडा.
  • किती क्षमतेचा सिंचन पंप तुम्हाला हवा आहे त्या संदर्भातील पर्याय निवडा.
  • नियम व अटीच्या स्वीकृतीसाठी दिलेल्या चौकटीमध्ये टिक करा.
  • सर्वात शेवटी जतन करा या पर्यायावर क्लिक करा.
  • अशा पद्धतीने तुम्ही इलेक्ट्रॉनिक सिंचन मोटार या घटकासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

बऱ्याच शेतकरी बांधवांकडे या सिंचन मोटार खरेदी करण्यासाठी पैसे नसतात परिणामी विहिरीमध्ये पाणी असून देखील ते आपल्या शेतातील पिकांना पाणी देवू शकत नाहीत.

मित्रांनो तुम्ही वरील दिलेली पद्धत वापरुन या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता .

विविध शासकीय योजनांची माहिती आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप्स मध्ये सामील त्यासाठी खलील लिंक वर टच करा.

शेतकरी ग्रुप मध्ये सहभागी व्हा शेती संबधित योजनांची माहिती मिळवा.

Leave a comment