Gram panchayat fund details in Marathi

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये gram panchayat fund details अर्थात ग्रामपंचायत निधी संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक विहीर दुरुस्ती इत्यादी योजनांसाठी शासनाकडून किती निधी पुरवठा केला जातो. परंतु गावातील अनेक नागरिकांना हा निधी किती मिळाला कधी मिळाला आणि कोणत्या कामासाठी मिळाला याची माहिती नसते.

मित्रांनो आता ग्रामपंचायत ला गावासाठी दिलेला निधि हा आता कुणापासूनही लपून ठेवता येणार नाही आता आपल्या गावातील सामान्य व्यक्ति सुद्धा ग्रामपंचायतचा लेखा जोखा पाहू शकता फक्त खलील पद्धतीने कृती करा. खलील पद्धत वाचून तुम्हाला समजत नसेल तर सर्वात शेवटी आम्ही व्हिडिओ दिला आहे तो बघा.

योजना कामाची विहीर अनुदान योजना करा ऑनलाईन अर्ज

Gram panchayat fund details अशा प्रकारे जाणून घ्या तुमच्या मोबाईलवर

  • सर्वात अगोदर गुगल प्ले स्टोअरमध्ये जा.
  • प्ले स्टोअरच्या सर्च मध्ये e gram swaraj असे टाईप करा.
  • Ministry of panchayat raj चे ई ग्राम स्वराज हे application ओपन होईल, मोबाईलमध्ये इंस्टाल करा.
  • जसे हि तुम्ही हे मोबाईल एप्लीकेशन ओपन कराल त्यावेळी राज्य, जिल्हा परिषद, block panchayat म्हणजेच तालुका आणि village मध्ये तुमचे गाव निवडल्यानंतर Submit या बटनावर क्लिक करून सादर करा.
  • वरील प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुमच्या ग्रामपंचायत संदर्भातील 3 ठळक बाबी तुम्हाला दिसेल
  • दिसेल १) ER Details २) Approved Activities ३)Financial Progress
  • ज्या प्रकारची माहिती तुम्हाला हवी असेल त्या पर्यायावर क्लिक करताच तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर संपूर्ण माहिती दिसेल. क्रमांक 3 च्या म्हणजेच Financial Progress पर्यायावर क्लिक करून तुम्ही निधी किती आला आणि किती खर्च झाला याचा हिशोब बघू शकता.

आमच्याशी कनेक्ट व्हा.

खलील व्हिडिओ बघा

Leave a comment