डीजल पंप अनुदान योजना 2022 ऑनलाईन अर्ज सुरु.

नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण या लेखामद्धे diesel pump subsidy म्हणजेच डीजल पंप अनुदान योजना या विषयी पूर्ण माहिती सविस्तर जाणून घेणार आहे. या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज सुद्धा करता येतो. ऑनलाइन अर्ज कुठे आणि कसा करायचा हे आपण या लेखात बघूया.

अशावेळी डीजल पंप अनुदान योजना शेतकऱ्यांसाठी महत्वाची ठरू शकते. डीजल पंप सब्सिडी मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज केल्यास यावर शासनाकडून सबसिडी मिळते ज्यामुळे शेतकरी बांधवाना पंप खरेदी करण्यास मदत मिळते.

तुम्हाला माहितीच असेल की आपल्या विहीरीतील पाणी उपसा मोटर सुद्धा आता आता अनुदानावर मिळते ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खलील लिंक ला टच करा.

विहीर मोटार अनुदान योजना असा करा ऑनलाईन अर्ज

डीजल पंप अनुदान योजना ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस खालीलप्रमाणे

  • युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा किंवा आधार otp द्वारे लॉगीन करा.
  • अर्ज करा या निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा.
  • सिंचन साधने व सुविधा या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा.
  • या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका आणि सर्वेक्षण नंबर अगोदरच आलेला दिसेल.
  • मुख्य घटकमध्ये सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडा.
  • बाब या पर्यायाच्या खाली दिसणाऱ्या चौकटीमध्ये क्लिक करा. पंपसेट, इंजिन व मोटर हा पर्याय निवडा.
  • हिरव्या रंगाच्या जतन करा या बटनावर क्लिक करा.
  • जतन करा करा या बटनावर क्लिक करताच एक सूचना येईल ती वाचून घ्या.
  • अर्ज सादर करा या निळ्या रंगाच्या बटनावर क्लिक करा.
  • परत एक सूचना येईल ती देखील वाचून घ्या.
  • पहा या निळ्या रंगाच्या बटनावर क्लिक करा आणि प्राधान्य क्रमांक निवडा.
  • योजनेच्या अटी आणि शर्थी मान्य करण्यासाठी चौकटीमध्ये क्लिक करा.
  • अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.

आणखी कामाची योजना PVC पाईप लाईन अनुदान योजना २०२२

डीजल पंप पंप अनुदान योजना पेमेंट करण्याची पद्धत.

  • महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत डीजल पंप सब्सिडी मिळविण्यासाठी २३.६० रुपये एवढे छोटेसे पेमेंट करावे लागते ते करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.
  • अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा या बटनावर क्लिक करताच Make payment असा पर्याय येईल त्यावर क्लिक करा.
  • पेमेंट करण्यासाठी या ठिकाणी विविध पर्याय दिसेल त्यापैकी एक पर्याय निवडा आणि पेमेंट करा.
  • यशस्वीपणे पेमेंट केल्यानंतर पोच पावती डाउनलोड करून घ्या.

अशाच शासकीय योजनाच्या महितीसाठी आमच्याशी कनेक्ट व्हा.

आमच्याशी कनेक्ट व्हा.

अधिक महितीसाठी आमचा खलील व्हिडिओ बघा.

Leave a comment