नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पण या लेखात सौर उर्जा कुंपण योजना महाराष्ट्र शासनाने एक नवीन योजना सुरु केली आहे त्याची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.या योजनेसाठी मंत्रीमंडळात बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले त्याची माहिती आपण पाहणार आहोत.
सौर उर्जा कुंपण योजना शेतकऱ्यांना होणार लाभ
या योजनेची नुकतीच दि.१८ एप्रिल २०२२ रोजी मंत्रीमंडळ बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सौर उर्जा किंपण उभारणीसाठी अनुदान देण्यास मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेची व्याप्ती वाढवून वन्यप्राण्यांमुळे शेतातील पिकांचे होणारे नुकसान टाळता यावे यासाठी महाराष्ट्र राज्यातील संवेदनशील गावांमध्ये हि सौर ऊर्जा कुंपण योजना राबविली जाणार आहे.
आणखी कामाची योजना डीजल पंप अनुदान योजना 2022 ऑनलाईन अर्ज सुरु.
मंत्रीमंडळ बैठकीत योजनेस मान्यता
वन्य प्राण्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणत नुकसान होते. जर शेतकरी बांधवाना या सौर कुंपण योजनेचा लाभ मिळाला तर नक्कीच त्यांचा फायदा होईल.दिनांक २८ एप्रिल २०२२ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना अंतर्गत हि योजना राबविली जाणार आहे.
सध्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये या योजनेस मान्यता देण्यात आलेली आहे. लवकरच या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन निर्णय काढण्यात येईल त्यावेळी देखील आपणास सूचना करण्यात येईल.
अधिक महितीसाठी खलील व्हिडिओ बघा
Suger losing
Information about Saur urja kumpan