saur urja kusum yojana सौर ऊर्जा कृषी पंपाचे अर्ज सुरु.

जर तुम्हाला नवीन सौर कृषी पंप सौर ऊर्जा कुसुम (saur urja kusum yojana)योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल किंवा तुम्ही अर्ज केला असेल आणि अजून पैसे भरायचे असतील तर, संबंधित माहिती येथे दिली आहे.

नवीन सौर उर्जा पंपासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा saur urja kusum yojana त्याच प्रमाणे लाभार्थीला सौर कृषी पंपासाठी पेमेंट करण्याची शेवटची तारीख किती आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

आणखी कामाची योजना सौर उर्जा कुंपण योजना ७५ टक्के अनुदान

saur urja kusum yojana खालील जिल्ह्याचा कोटा उपलब्ध

  • अकोला.
  • अमरावती.
  • भंडारा.
  • चंद्रपूर.
  • गडचीरोली.
  • गोंदिया.
  • कोल्हापूर.
  • नागपूर.
  • पालघर.
  • रायगड.
  • रत्नागिरी.
  • सांगली.
  • सातारा.
  • सिंधुदुर्ग.
  • ठाणे.
  • वर्धा.

आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

aur urja kusum yojana नोंदणी कशी करावी हे जाणून घेण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

  • अर्ज भरतांना परामुख्याने खालील माहिती तुम्हाला अर्जामध्ये भरावी लागणार आहे.     
  • नवीन किंवा बदली डीझेल पंपाची विनंती – या ठिकाणी डीझेल पंप आहे हा पर्याय निवडा आणि त्यानंतर अर्जामध्ये विचारलेली माहिती भरा.
  • अर्जदाराची वैयक्तिक व जमीन विषयक माहिती.
  • सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर अर्ज दाखल करा या बटनावर क्लिक करा.
  • माहिती अचूक भरल्याची खात्री केल्यावर होय पुढे चला या बटनावर क्लिक करा.
  • अर्ज व्यवस्थित भरून सादर केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक otp येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका.
  • verify otp या बटनावर क्लिक करा.
  • otp पडताळणी झाल्यवर तुमच्या मोबाईलवर युजरनेम आणि पासवर्ड येईल तो टाकून लॉगीन करा.
  • या ठिकाणी अर्जदाराची माहिती दिसेल पुढे जाण्यासाठी Complete your form go ahead या बटनावर क्लिक करा.
  • तुम्ही भरलेल्या अर्जाची स्थिती या ठिकाणी दिसेल. जी माहिती अपूर्ण आहे ती पूर्ण करा.
  • सर्वात शेवटी अर्ज दाखल करा या बटनावर क्लिक करून अर्ज दाखल करा.
  • अर्ज दाखल केल्यानंतर अर्जदाराच्या मोबाईल नंबरवर पैसे भरण्याचा संदेश येईल. त्यानंतर पैसे भरा या बटनावर क्लिक करून पेमेंट करा.
  • पेमेंट करण्यासाठी विविध पर्याय  दिलेले आहेत. तुम्ही जर ऑनलाईन पेमेंट केले तर लगेच पुरवठादार निवडा या बटनावर क्लिक करून तुम्ही सौर उर्जा पंपासाठी पुरवठादार निवडू शकता.
  • वरील पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. हि माहिती अधिक चांग्ल्याज पद्धतीने समजून घेण्यासाठी एक उत्तम ग्राफिक्स असलेली pdf फाईल तुम्ही बघू शकता किंवा download करू शकता.

ऑनलाईन अर्ज pdf

Leave a comment