Maharashtra loan scheme थेट कर्ज योजना सुरु करा अर्ज

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामद्धे Maharashtra loan scheme थेट कर्ज योजना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया. या योजनेसाठी पात्रता काय? कागदपत्रे कोणकोणती लागतात? योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा याची पूर्ण माहिती खलील लेखात बघूया. 

थेट कर्ज योजना maharashtra loan scheme योजनेचा लाभ घेवून बेरोजगार तरुण त्यांच्या व्यवसाय उद्योग सुरु करू शकतात. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये आज बेरोजगारी मोठ्या प्रमाणत वाढलेली आहे. अशावेळी तुम्ही जर या थेट कर्ज योजनेचा maharashtra loan scheme लाभ घेतला तर तुम्हाला १ लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते आणि यामुळे नक्कीच तुमचा फायदा होऊ शकतो.

आणखी कामाची योजना डीजल पंप अनुदान योजना 2022 ऑनलाईन अर्ज सुरु.

Maharashtra loan scheme थेट कर्ज योजना लाभार्थी पात्रता

  • लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि तो इतर मगासवर्गीय असावा.
  • अर्जदाराने शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत किंवा निमशासकीय संस्थामधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले असावे.                                                                   
  • अर्जदाराने ज्या बँक खात्याशी आधार कार्ड सलग्न आहे त्या बँकेचे तपशील सादर करावेत.
  • जो व्यवसाय अर्जदार निवडेल त्या व्यवसायाचे त्यास ज्ञान असणे गरजेचे आहे.

Join WhatsApp Group

अर्जासोबत जोडावयाचा कागदपत्रांचा तपशील

  • महामंडळ वेबपोर्टलवर किंवा संगणक प्रणालीवर अर्जदाराची नाव नोंदणी आवश्यक आहे.
  • शिधापत्रिका प्रमाणित प्रत.
  • आधार कार्ड.
  • पासपोर्ट फोटो.
  • ज्या ठिकाणी व्यवसाय सुरु आहे त्याची भाडे पावती.
  • ७/१२ उतारा.
  • जन्म तारखेचा दाखला.
  • दोन जमीनदरांचे हमीपत्र.
  • स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र.
  • व्यवसाय सुरु करण्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र.
  • तांत्रिक व्यवसायासाठी लागणारे परवाण्याची प्रत.
  • प्रकल्प अहवाल.
  • कच्चा माल व यंत्र सामुग्रीचे दरपत्रक.

आणखी हेही वाचा सौर उर्जा कुंपण योजना ७५ टक्के अनुदान

थेट कर्ज योजना १ लाख रुपयापर्यंत योजनेचा तपशील

  • अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्षे एवढे असावे.
  • अर्जदाराचा ५०० एवढा सिबिल क्रेडीट स्कोर असणे आवश्यक आहे.
  • एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागासाठी १ लाखापर्यंत असावे.
  • अर्जदाराने जर नियमितपणे ४८ समान मासिक हफ्यांमध्ये मुद्दल रुपये २०८५ तर कोणतेही व्याज भरावे लागणार नाही.
  • परंतु नियमित कर्जाची परतफेड केली नाही तर जितके हफ्ते थकीत होतील त्या सर्व थकीत हफ्त्यांच्या रक्कमेवर दर साल दर शेकडा ४ टक्के व्याजदर आकारण्यात येतो.
  • ७५ हजार रुपयांचा पहिला हफ्ता मिळतो.
  • २५ हजार रुपयांचा दुसरा हफ्ता मिळविण्यासाठी प्रत्यक्ष उद्योग सुरु असणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष उद्योग सुरु झाल्यानंतर ३ महिन्यानंतर जिल्हा व्यवस्थापकांची तपासणी होते. त्यांचा अभिप्राय आल्यानंतर दुसरा २५ हजार रुपयांचा हफ्ता मिळतो.

कर्ज मंजुरी प्रक्रिया महितीसाठी येथे टाच करा.

अर्ज करण्यासाठी खालील अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

अधिकृत वेबसाईट लिंक

Leave a comment