Gharkul list 2022 या जिल्ह्याची घरकुल यादी आली

नमस्कार मित्रांनो आपण जर घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल तर Gharkul list 2022 आलेली आहे या लिस्ट मध्ये तुमचं नाव आहे की नाही ते बघा. यामध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्याची यादी याठिकाणी आली आहे व ज्या लाभार्थीचे या यादीत नाव आहे त्यांनी या योजनेचा कसा लाभ घ्यायचा त्या विषयी संपूर्ण माहिती आपण या ठिकणी जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र शासनाच्या जी. आर मध्ये gharkul list 2022 आली आहे. मागासवर्गीय व बहुजन विभागाच्या वतीने लाभार्थीना घरकुल बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेसाठी निधी उपलब्ध करण्याबाबत शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आला आहे.

Gharkul list 2022 यादी मध्ये बघा तुमच्या नाव आहे का

८६ लाभार्थ्यांच्या घरकुल प्रस्तावास सहाय्यक आयुक्त समाज बुलढाणा यांच्या मार्फत जिल्ह्याधिकारी यांच्या मान्यतेने मंजुरी देण्यात आलेली आहे.यासाठी एक कोटी सात लाख बत्तीस हजार आठशे एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी लाभार्थीकडे भटक्या जमाती क प्रवर्गाची असणे बंधनकारक असणार आहे.

हि यादी फक्त बुलढाणा जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची आहे. शासन निर्णय आणि पात्र लाभार्थ्याची यादी बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Gharkul list 2022 लाभ घेण्यासाठी खालील गोष्टी गरजेच्या

  • सर्व लाभार्थ्यांची जात प्रमाणपत्रे भटक्या जमाती क प्रवर्गाची असणे बंधनकारक राहील.
  • जातीचे प्रमाणपत्र असल्याशिवाय योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • २०२२-२३ या वर्षाचे उत्पन्नाचे दाखले सादर करणे आवश्यक राहील.
  • ज्या दिवशी आदेश मिळाला त्या दिवसापासून १ महिन्याच्या आत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
  • नावात जर तफावत असेल तर संबधित व्यक्तीच्या नावाचा पालकाचा नाव व आडनावाचा पुरावा सादर करणे बंधनकारक राहील.
  • जर नावात फरक असेल तर अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

शौचालय योजना ऑनलाइन फॉर्म सुरु करा अर्ज

4 thoughts on “Gharkul list 2022 या जिल्ह्याची घरकुल यादी आली”

Leave a comment