महिला बचत गट कर्ज योजना सुरू पहा किती कर्ज मिळणार.

मित्रांनो नमस्कार महिलांना आता महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना अंतर्गत महिला बचत गट कर्ज मिळू शकणार आहे. आणि जे कर्ज महिला बचत गटांना मिळणार आहे त्यावरील १२ टक्के व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा महामंडळामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना राबविली जात आहे.ग्रामीण भागातील महिलांना सोप्या पद्धतीने पैसा उपलब्ध व्हावा आणि त्यातून या महिलांनी त्यांचा उद्योग व्यवसाय उभारून सक्षम होण्यासाठी गावावामध्ये बचत गटांची निर्मिती करण्यात आलेली आहे.

आपला नंबर टाकून आमच्याशी कनेक्ट व्हा

महिला बचत गट कर्ज योजनेचे स्वरूप

  • बचत गटाने पहिल्या टप्प्यातील कर्ज व्यवस्थित परतफेड केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी १० लाख रुपयांचे कर्ज घेण्यास असा गट पात्र ठरेल.
  • महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी महिला बचत गटामध्ये कमीत कमी ५० टक्के महिला इतर मागास प्रवर्गातील असायला हव्यात.
  • पहिल्या टप्प्यामध्ये अशा बचत गटांना बँकेकडून ५ लाखापर्यंत कर्ज घेण्यास मंजुरी देण्यात येईल.
  • बँकेकडून जे कर्ज मंजूर होईल त्या कर्जाचे कमाल १२ टक्के व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा OBC महामंडळामार्फत अदा करण्यात येईल.

Also Read This शौचालय योजना ऑनलाइन फॉर्म सुरु करा अर्ज

अर्जासोबत सादर करायची कागदपत्रे.

  • रहिवासी दाखला.
  • वयाचा पुरावा.
  • जातीचा दाखला.
  • बचत गटाचे बँक पासबुक ( झेरॉक्स )
  • CMRC कडून प्रमाणित कौटुंबिक उत्पन्नाबाबतचे प्रमाणपत्र.
  • अर्जदार महिलेने कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • महिलेचे वय कमीत कमी १८ व जास्तीत जास्त ६० वर्षे राहील.

Leave a comment