बीड पॅटर्न धूम धडाक्यात चार दिवसात 40 हजार शेतकऱ्यांचे अर्ज

बीड पॅटर्न धूम धडाक्यात चार दिवसात 40 हजार शेतकऱ्यांनी केले अर्ज तुम्ही केला का अर्ज लगाचे करून द्या अर्ज, अर्ज करण्यासाठी 31 जुलै पर्यंत मुदत. 

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण मागच्या लेखात जाणून घेतले की महाराष्ट्र शासनाने पीक विमा योजनेत बीड पॅटर्न लागू केला आहे त्यामध्ये आपण बघितले की बीड पॅटर्न का लागू केला त्याचा काय फायदा आहे आणि कोणासाठी आहे. 

बीड पॅटर्न धूम धडाक्यात सुरू झाला आहे याचे कारण असे की राज्यात चार दिवसात 40 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी अर्ज केले आहे. 

हे देखील वाचा : पीक विमा योजनेत बीड पॅटर्न लागू काय आहे बीड पॅटर्न पहा सविस्तर

बीड पॅटर्न धूम धडाक्यात चार दिवसात 40 हजार अर्ज 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी बीड पॅटर्नच्या पहिल्याच खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पहिल्या चार दिवसात विमा हप्ता भरण्यासाठी गर्दी केली. 

आता पर्यंत 40 हजार शेतकऱ्यांनी या योजनेत भाग घेतला आहे, पीक विमा योजनेत बीड पॅटर्न लागू झाल्याचा नियम एक जुलै रोजी घेतल्यानंतर  कृषी विभागाने जलद हालचाली करीत शेतकऱ्यांसाठी संकेतस्थळ दुसऱ्या दिवशी सुरू केले. 

त्यामुळे राज्य भरातून विमा अर्ज करण्यास सुरुवात झाली. योजनेत बदल केल्यानंतर देखील कोणत्याही अडथल्याविना योजनेच्या कमाल कामाला सुरुवात झाली आहे. अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.

हे देखील वाचा : शबरी घरकुल योजना निधी आला pdf मध्ये अर्ज उपलब्ध  

पीक विमा अर्ज करणे गरजेचे

शेतकरी मित्रांनो पीक विमा अर्ज करणे ही गरजेचे आहे कारण शेतकरी वर्गाला समस्याना सामोरे जावे लागते काहीवेळा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेत मालाचे खूप नुकसान होते त्याचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांनी पीक विमा भरून आपले झालेले आर्थिक नुकसान भरून काढावे त्यासाठी पीक विमा अर्ज करणे अतिशय आवश्यक आहे.

शेतकरी मित्रांनो पीक विमा भरणे यह अतिशय गरजेचा आहे कारण पीक विम्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचे आर्थिक नुकसान टाळू शकता त्यासाठी प्रत्येक शेकऱ्यांनी पीक विमा भरणे आवश्यकच आहे

अर्ज करण्यासाठी 31 जुलै पर्यंत मुदत 

खरीप हंगाम 2022-23 करीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी 31 जुलै ही अंतिम दिनांक आहे, या तरखेपर्यंत शेतकऱ्यांनी विमा भरावा. 

आधिक माहितीसाठी जिल्हा बँकेची शाखा, राष्ट्रीयकृत बँकेची शाखा, विविध कार्यकारी सोसायटी, कृषी खात्याचे कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागी कृषी अधिकारी, csc सेंटर या ठिकाणी संपर्क साधावा , असे आव्हान कृषी विभागामार्फत देण्यात आले आहे. 

मित्रांनो तुम्हाला अशाप्रकारचे उपडेट्स तुमच्या व्हाट्सअॅप वर मिळव्यासाठी आमच्याशी कनेक्ट व्हा खलील लिंक वर क्लिक करा किंवा येथे टाच करा.

आमच्याशी कनेक्ट व्हा

Leave a comment