ई पीक पाहणी ॲप पिके व बंधावरील झाडांची नोंद करा सतबऱ्यावर

ई पीक पाहणी ॲप द्वारे पिकाची व बंधावरील झाडांची सतबऱ्यावर करा नोंद ई पीक पाहणी करण्यास झाली सुरुवात मोबाईल वरून करा ई पीक पाहणी. 

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज या लेखीत पिकाची व बंधावरतील झाडांची सतबऱ्यावर नोंद म्हणजेच ई पीक पाहणी काशी करावी या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. 

ई पीक पाहणी ॲप द्वारे च्या मदतीने तुम्ही तुमच्या पिकाची व बंधावरील झाडांची ई पीक पाहणी अतिशय सोप्या पद्धतीने करू शकता.

हे app तुम्हाला मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये मिळेल ते तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करायचे आहे app डाउनलोड केल्यानंतरची माहिती खाली सविस्तर पाहूया. 

ई पीक पाहणी मोबाईल ॲप इंस्टाल झाल्यावर पुढील प्रोसेस.

  • e peek pahani हे एप्लिकेशन पूर्णपणे इंस्टाल झाल्यावर ओपन करा.
  • e peek pahani application ओपन होत असतांना या ठिकाणी काही सूचना दिसेल त्या वाचून घ्या.
  • सर्व सूचना वाचल्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करा.
  • मोबाईल नंबर प्रविष्ट करा अशी सूचना येईल त्या खाली एक चौकट दिलेली असेल त्या चौकटीमध्ये तुमचा सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर टाका व पुढे या बटनावर टच करा.
  • त्यानंतर तुमचा जिल्हा तालुका व गाव दिलेल्या यादीतून निवडा. सर्व माहिती व्यवस्थित निवडल्यानंतर पुढे या बटनाला टच करा.
  • जसे तुम्ही पुढे या बटनावर टच कराल त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जमिनी संदर्भातील माहिती भरावी लागणार आहे.
  • खातेदार निवडण्यासाठी तुम्हाला अनेक पर्याय या ठिकाणी दिसेल जसे कि पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक व गट क्रमांक यापैकी एक कोणताही पर्याय तुम्ही निवडू शकता.
  • खातेदार निवडण्यासाठी शक्यतो पहिले नाव भरावे
  • दिलेल्या चौकटीमध्ये मराठी भाषेमध्ये तुमचे नाव टाईप करा आणि शोधा या बटनावर टच करा.
  • खातेदार निवडा या बटनावर टच करताच तुमच्या नावासारखे इतर खातेदारांची यादी सुद्धा तुम्हाला दिसेल त्यापैकी तुमचे तुमच्या नावाच्या खात्यावर टच करा आणि पुढे या बटनावर टच करा.

हे देखील वाचा :खरीप पीक विमा योजना ऑनलाईन अर्ज भरणे सुरू online arj 2022

ई पीक पाहणी नोंदणी अर्ज प्रक्रिया 

  • तुमच्या नावाच्या खाली तुमच्या खात्याचा नंबर या ठिकाणी आलेला असेल त्या समोरील चौकटीत टिक करा आणि पुढे या बटनला टच करा.
  • आपली नोंदणी खालील मोबाईल क्रमांकावर करण्यात येत आहे आपणाला मोबाईल क्रमांक बदलायचा असल्यास ‘ मोबाईल क्रमांक बदल’ या बटनावर टच करा.’
  • तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक बदलायचा नसल्यास पुढे या बटनाला टच करा.
  • जसे हि तुम्ही पुढे या बटनाला टच कराल त्यावेळी एक otp तुमच्या मोबाईल नंबरवर पाठविला जाईल तो otp दिलेल्या चौकटीत अचूकपणे टाका आणि संकेतांक भरा या बटनाला टच करा.

अशा पद्धतीने ई पीक पाहणी एप्लिकेशन नोंदणी अर्ज भरलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला एक dashboard दिसेल यामध्ये तुम्हाला अनेक पर्याय दिसतील जसे की,

  • परिचय.
  • पिकांची माहिती नोंदवा.
  • कायम पड नोंदवा.
  • बांधावरची झाडे नोंदवा.
  • अपलोड.
  • पिक माहिती मिळवा.

परिचय या बटनाला टच करून तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती भरू शकता तुमचा फोटो देखील अपलोड करू शकता त्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

  • त्यासाठी परिचय या बटनाला टच करा.
  • नंतर परिचय आणि खातेदाराची माहिती या ठिकाणी शेतकऱ्यांना भरावयाची आहे.
  • फोटो बदलण्यासाठी निवडा या बटनावर टच करा किंवा त्या बाजूला दिसत असलेल्या कॅमेऱ्याच्या आयकॉनला टच करा आणि तुमचा फोटो काढा.
  • परिचय या पर्यायाखालील चौकटीमध्ये स्त्री, पुरुष किंवा इतर असे पर्याय दिसतील त्यापैकी एक पर्याय निवडा.
  • त्यानंतर सबमिट या बटनावर टच करा.
  • खातेदरांची माहिती या सदरामध्ये खते क्रमांक शेतकऱ्याला निवडायचा आहे त्यासाठी दिलेल्या चौकटीमध्ये टच करा आणि तुमचा खाते क्रमांक निवडा.

अशा पद्धतीने शेतकरी त्यांची वैयक्तिक माहिती भरू शकतात.

ई पीक पाहणी app मध्ये अशी करा पिकाची नोंदणी 

  • पिकांची माहिती नोंदवा या बटनावर टच करा.
  • पीक पेरणीची माहिती भरा आणि पिकांची माहिती अशा दोन सदराखाली या ठिकाणी शेतकऱ्यांना माहिती भरावयाची आहे.
  • पीक पेरणीची माहिती या सदरामध्ये खाते क्रमांक निवडा या पर्यायाखाली दिलेल्या चौकटीवर टच करा. या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा खाते नंबर निवडायचा आहे.
  • शेतजमिनीचा भूमापन किंवा गट क्रमांक निवडायचा आहे.
  • जसेही तुम्ही तुमच्या शेत जमिनीचा गट क्रमांक निवडाल त्यावेळी तुमच्या जमिनीसंदर्भातील व पोट खराबा सांधर्भात सर्व माहिती या ठिकाणी आपोआप दर्शविली जाईल.
  • पेज ला थोडे खाली स्क्रोल करा.
  • हंगाम निवडा या पर्यायाखाली दिसत असलेल्या चौकटीवर टच करून शेतकरी खरीप किंवा रब्बी हंगाम निवडू शकतात.

पिकांचा वर्ग या पर्याय खाली दिलेल्या चौकटीवर क्लिक करताच या ठिकाणी पिकांच्या वर्गांचे अनेक पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसतील जसे की, निर्भेळ पिक म्हणजेच एक पिक, मिश्र पिक म्हणजेच अनेक पिके, पॉली हाउस पिक, शेडनेट पिक, पड क्षेत्र या पैकी योग्य पर्याय या ठिकाणी निवडावा.

हे देखील वाचा : पीक विमा योजनेत बीड पॅटर्न लागू काय आहे बीड पॅटर्न पहा सविस्तर

ई पीक पाहणी द्वारे बंधावरील झाडांची नोंद

शेतकऱ्यांच्या बांधावर बरीच झाडे असतात या पैकी जर आंबा, बोअर, पिंपळ, कडूनिंब व अजूनही इतर प्रकारची झाडे असतील तर शेतकरी हि झाडे स्वतः सातबऱ्यावावर नोंदवू शकतात. बांधावरील झाडे सातबऱ्यावर नोंदविण्याची पद्धत कशी आहे ती समजावून घेवूयात.

  1. ई पीक पाहणी ॲपच्या डॅशबोर्डवर दिसत असलेल्या बांधावरील झाडे या बटनावर टच करा.
  2. खाते क्रमांक निवडा.
  3. शेताचा गट क्रमांक निवडा.
  4. दिलेल्या यादीतून तुमच्या शेताच्या बांधवावर जे झाड असेल ते निवडा.
  5. झाडाची संख्या दिलेल्या चौकटीत टाका.
  6. सर्वात शेवटी बांधावरील झाडाचे छायाचित्र अपलोड करा यासाठी कॅमेरा आयकॉनच्या बटनावर टच करा.
  7. आमच्या शेताच्या बांधावर बोरीचे झाड आहे महणून आता या ठिकाणी बोर या झाडाचा फोटो काढून तो अपलोड करत आहे.
  8. छायाचित्र काढल्यावर सबमिट करा या बटनावर क्लिक करा.

ई पीक पाहणी काशी करावी याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा 

Leave a comment