Annasaheb patil loan अण्णासाहेब पाटील योजनेचा निधी आला असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची काय पद्धत काय आहे हे या लेखात जाणून घेऊया.
या कर्ज योजनेसाठी कोणते नागरिक पात्र आहे आहे व त्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आज या लेखात जाणून घेऊया.
दिनांक 8 जुलै २०२२ रोजी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेसाठी 30 कोटी एवढा निधी वितरीत करण्यासंदर्भातील शासन निर्णय दिनांक नुकताच निर्गमित करण्यात आलेला आहे.
मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना रोजगार निर्मितीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना अंतर्गत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.
हे देखील वाचा : पॅन आधार लिंक केले नाही आता आता भरावा लागणार दुप्पट दंड
annasaheb patil loan apply
हा अर्ज कसा करावा लागतो. किती आणि कोणत्या व्यवसायासाठी किती कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
जेणे करून तुम्हाला देखील या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेचा लाभ घेता येईल त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत वाचा.
शासन निर्णयानुसार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेसाठी 30 कोटी एवढा निधी वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे.
या योजनेसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास सन २०२२-२३ साठी १०० कोटी एवढा निधी मिळणार आहे.
त्यापैकी 30 कोटी निधी वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय 8 जुलै २०२२ रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.
शासन निर्णय संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना माहिती
नोकरी नसल्यामुळे मराठा समाजातील अनेक तरुण बेरोजगार आहेत. अशा बेरोजगार तरुणांना या योजनेतून आर्थिक सहाय्य म्हणून बिनव्याजी कर्ज दिले जाते. दिलेल्या कर्जावरील व्याज महामंडल भरते.
बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळून बेरोजगारीवर मत करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी लाभार्थ्याने महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- फक्त मराठा तरुणच नव्हे तर कोणत्याही जातीचा लाभार्थी ज्यासाठी कोणतेही महामंडळ कार्यरत नाही अशा व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- पुरुषांसाठी ५० तर महिलांसाठी ५५ वर्षे वायोमर्यादा ठरवून दिलेली आहे.
- कर्ज योजनेचा लाभ ५ वर्षासाठी मिळतो.
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा
योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा