नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामद्धे वैयक्तिक कर्ज योजना या योजनेविषयी पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. वैयक्तिक कर्ज योजना ही इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागामार्फत राबविली जाते. या योजनेत मागासवर्गीय व्यक्ति भाग घेऊ शकतो. या योजनेच्या माध्यमातून मागासवर्ग प्रवर्गातील नागरी अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता विशेष म्हणजे भारतातील मागास प्रवर्गासाठी ही योजना राबविली जाते.
मागासवर्गीय समजतील लोकांच्या कल्याणासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या योजनेची निर्मिती करण्यात आली आहे तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायात प्रगती करावी.
आणखी कामाची योजना मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र
अर्ज करण्यासाठी लागणारी अर्जदारची पात्रता
- अर्जदार इतर मागासवर्गीय असावा.
- महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा.
- अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे असावे.
- अर्जदाराचे कर्जखाते आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य आहे.
- महामंडळाच्या वेबपार्टल / संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य आहे.
- अर्जदाराने अर्ज करतेवेळी या प्रकल्पासाठी व यापूर्वी हया महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- अर्जदार कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
- अर्जदाराने कर्ज प्रकरण हे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली ( पी.एफ.एम.एस. ) अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे हाताळण्यास सक्षम असलेल्या बँकेत केलेले असावे.
- एकावेळी कुटूंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- जातीचे प्रमाणपत्र.
- आधार कार्ड.
- शिधा पत्रिकेची प्रमाणित प्रत.
- पॅन कार्ड.
- पासपोर्ट साईज फोटो.
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
- जन्मतारखेचा दाखला.
- रहिवासी दाखला / पुरावा, आधार लिंक बॅक खात्याचा पुरावा
असा करा ऑनलाईन अर्ज
- वैयक्तिक कर्ज योजना अर्ज करण्यासाठी तुम्हाला इतर मागासवर्ग भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग कल्याण विभागाच्या वेबसाइट वर जावे लागेल किंवा येथे क्लिक करून सुद्धा तुम्ही या संकेतस्थळावर जाऊ शकता.
- या वेबसाइट वर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी उजव्या साईट ला नोंदणी करा म्हणून असा एक पर्याय दिसेल त्यावर लिंक करा.
- त्यावर क्लीक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज ओपन होईल तो तुम्हाला पूर्ण भरायचा आहे.
- या अर्जामध्ये सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या प्रसूत करणे या बाटणवर क्लिक करायचे आहे.
- आता या ठिकाणी तुमची नोंदणी पूर्ण झाली असले तर पुढे दिलेली सर्व माहिती तुम्हाला या अर्जामध्ये भरून अर्ज सबमीट करायचा आहे.
- या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाकार्यालयाशी संपर्क साधू शकता.
योजनेच्या अधिक महितीसाठी येथे क्लिक करा