शेतकारी बंधूंनो तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेले असेल तर अशा शेतकरी बांधवांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण अशा सावकारी शेतकरी कर्ज माफी होणार असल्याचा शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर निर्गमित करण्यत आलेला आहे.
सावकारी शेतकरी कर्ज माफी संदर्भातील नवीन जी आर आज म्हणजेच दिनांक २७ जुलै २०२२ रोजी काढण्यात आलेला आहे. या जी आर नुसार १ कोटी एवढा निधी देखील वितरीत करण्यात येणार आहे.
आणखी कामाची योजना अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2022
सावकारी शेतकरी कर्ज माफी फक्त परवानाधारक सावकारांचीच केली जाणार
आज दिनांक २७ जुलै २०२२ रोजी हा शासन निर्णय काढण्यात आलेला असला तरी हे कर्ज माफी देण्यासाठी १३ सप्टेंबर २०१९ रोजी घेण्यात आलेल्या शासन निर्णयाचा आधार घेण्यात आलेला असून त्यासाठी १ कोटी एवढा निधी वितरण करण्यात येणार आहे.
केवळ त्याच शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले जाणार आहे ज्या शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेले आहे.खाजगी सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ केले जाणार नाही हे लक्षात असू द्या.
थोडीशी अधिक माहिती
शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आर्थिक अडचण भासते अशावेळी शेतकऱ्यांना बँकेकडून लगेच कर्ज मिळणे शक्य नसते. अशावेळी शेतकरी बांधव खाजगी सावकारांकडून कर्ज काढतात आणि आपली शेतीची कामे भागवितात. बँकेची कर्ज माफ केली जातात परंतु खाजगी सावकारांकडून घेतलेय कर्जाचे काय असा प्रश्न उपस्थित होतो.
मा. उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे सावकारग्रस्त शेतकरी समिती बुलढाणा यांच्यावतीने श्री अरुण सीताराम इंगळे यांनी एक जनहित याचिका न्यायालयास सादर केली होती.
विविध शासकीय योजनांची माहिती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा