शेतकरी बंधूंनो केंद्राची व्याज सवलत योजना पुन्हा लागू करण्यात आली आहे ही योजना पुन्हा लागू केल्यामुळे अल्पमुदत पीककर्जधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या योजनामध्ये तीन लखपर्यंतचे पीक कर्ज वेळेत परतफेड शेतकऱ्यांना व्याज सवलत न देण्याचा निर्णय केंद्राने मागे घेतला आहे आता दोन टक्क्याएवजी दीड टक्के व्याज सवलत देण्यास शासनाने निर्णय घेतला आहे.
व्याज सवलत योजना बंद करण्यात येत असल्याचे केंद्राने काही महिन्यापूर्वी घोषित केले होते. त्यामुळे वेळेत पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के दरात तीन लाखापर्यंतचे कर्ज देता येणार नाही,असे देशातील जिल्हा बँकाच्या लक्षात आले होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वस्तुस्थितीची माहिती करून देण्यात आली, त्यामुळे केंद्राने व्याज सवलत योजना चालू ठेवण्यास मंजूरी दिल आहे.
आणखी कामाची योजना मिनी ट्रॅक्टर योजना ९० टक्के अनुदान मिळणार
केंद्राची व्याज सवलत योजना पुन्हा लागू
मननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्री मंडळ बैठकीत केंद्राची व्याज सवलत योजना पुन्हा लागू करण्यात मंजूरी देण्यात आलेली आहे.
2022 ते 25 या कालावधीसाठी अल्पमुदत पीककर्ज पुरवठ्यासाठी 34,865 कोटी रुपयाची व्याज सवलत मिळणार आहे मात्र ही सवलत आता दोन एवजी दीड टक्के मिळणार आहे. या निर्णयामुळे बँक आता आर्थिक संकटात सापडणार असून अर्धा टक्का तरतूद स्वखर्चातून करू शकतात
अल्पमुदत पीककर्जधारक शेतकऱ्यांना दिलासा
केंद्राची व्याज सवलत योजना पुन्हा लागू केल्याने अल्पमुदत पीककर्जधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना या योजनामुळे मोठा फायदा होणार आहे.
या निर्णयाचा लाभ सार्वजनिक-खाजगी क्षेत्रातील बँका, लहान पतपुरवठादार बँका, क्षेत्रीय ग्रामीण बँका, सहकारी बँक आणि सांगणकीकृत प्राथमिक कृषी पुरवठादार संस्थामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
केंद्राची व्याज सवलत योजनेची वैशिष्टे
- व्याजचा दर 7 टक्के असेल. मात्र त्या तीन टक्के तत्काळ परतफेड सवलत असेल म्हणजे वेळेत कर्ज परतफेड केल्यास फक्त चार टक्के दराने कर्ज उपलब्ध होईल.
- तीन लाखापर्यंतचे अल्पमुदत पीक कर्ज वेळेत परतफेड केल्यास दीड टक्के व्याज सवलत मिळेल.
- व्याज सवलत योजनेचे (आयएसएस) नाव आता सुधारीत व्याज सवलत योजना (एमआयएसएस) करण्यात आले आहे.
- ही कर्ज योजना पशूसंवर्धन, डेयरी , मत्स्य व कुकुटपालन उद्योगामधील शेतकऱ्यांना मिळेल.
टीप: योजनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या सोसायट्या किंवा बँकाशी संपर्क साधावा.