नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामद्धे गोदाम बांधकाम योजना अंतर्गत शासकीय अनुदान मिळते आणि यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्यातील कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा लागतो.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कडधान्य अंतर्गत शेतकरी बांधव गोदाम बांधकाम योजनाअंतर्गत अर्ज सादर करू शकतात.
गोदाम बांधकाम योजना
खूप शेतकरी असे आहेत ज्यांना आपल्या शेतातील पिकांची मळणी करून ते पिक गोडावून मध्ये साठवून योग्य वेळी बाजारामध्ये आणण्याची इच्छा असते. केवळ पिक साठवणुकीसाठी गोडावून म्हणजेच गोदाम नसल्यामुळे ते पिक साठवू शकत नाहीत आणि योग्य वेळी मार्केटमध्ये नेऊ शकत नाहीत त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी हि योजना खूप फायदेशीर ठरू शकते. शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची व्यवस्थित साठवणूक व्हावी यासाठी महाराष्ट्र शासन गोदाम बांधकामासाठी अनुदान देत असते. परंतु अनेक शेतकरी बांधवाना गोदाम अनुदान योजना बद्दल माहिती नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि शेतातील पिक साठवणुकीसाठी गोदाम बांधू इच्छित असाल तर नक्कीच हि योजना तुमच्या कामाची ठरणार आहे.
अशी आहे गोदाम बांधकाम योजना
गोदाम बांधकाम योजना अंतर्गत अर्ज करून शेतकरी बांधव या योजनेचा लाभ घेऊ शकतात. शेतकरी बंधुंनो गोदाम हि आहे तरी कशी या संदर्भात माहिती जाणून घेवूयात.
- तालुक्यातील कृषी अधिकारी यांच्याकडे करावा लागणार अर्ज.
- राष्ट्रीय अन्न सुरक्षा कडधान्य योजना अंतर्गत मिळणार लाभ.
- जास्तीत जास्त २५० टन क्षमतेचे गोदाम बांधकामासाठी मिळणार अनुदान.
- प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा साडेबारा लाख रुपये यापैकी जे कमी असेल तितके मिळणार शासकीय अनुदान.
- शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनीकडून मागविले जात आहे अर्ज.
- वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषांप्रमाणे लाभार्थ्यांनी जागेची निवड करणे गरजेचे.
विविध शासकीय योजनाची माहिती आपल्या मोबाईलवर मिळवण्यसाठी आमच्याशी कनेक्ट व्हा. त्यासाठी खलील कनेक्ट व्हा लिंक वर क्लिक करा.