या वर्षी मक्याला ३ हजार पेक्षा जास्त भाव मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. जागतिक मका उत्पादन २०२२-२३ मध्ये ३२० लाख टनांनी कमी राहण्याचा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने म्हणजेच USDA ने वर्तविला आहे.
आजघडीला अमेरिकेमध्ये मका पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. अमेरिकेतील मका पिकांना या वर्षी उष्णतेचा फटका बसतो आहे. याचा परिणाम म्हणून या वर्षी अमेरिकेतील मका उत्पादनाचे प्रमाण घातलेले आहे.
अमेरिकेतील मका पिकांचे उत्पादन १५५ लाख टनांनी घटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्याच प्रमाणे इतर देशांमध्ये देखील मका पिकांच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
मक्याला ३ हजार पेक्षा जास्त भाव मिळण्याची कारणे
- मागील वर्षी म्हणजेच २०२१ रोजी युक्रेन देशामध्ये ४२१ लक्ष टन मका पिकांचे उत्पादन घेण्यात आलेले होते. चालू वर्षी मका पिकाचे उत्पादन २५० लाख टनावर स्थिरावण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
- यावर्षी जागतिक मका निर्यात १६७ लक्ष टनांनी कमी राहण्याची शक्यता आहे. युक्रेन देशामधून निर्यात होणारा मका १५० लक्ष टनांनी कमी राहील.
- मका पिकाचे उत्पादन कमी झाल्यामुळे आपसूकच मका पिकांची मागणी वाढणार आहे त्यामुळे मका पिकास चांगला भाव मिळणार आहे हे मात्र नक्की.
- जागतिक मका निर्यातहि यावर्षी कमी असणार आहे. त्यामुळे एकूणच जागतिक मका पिक उत्पादन कमी राहणार आहे.
मक्याला ३ हजार पेक्षा जास्त भाव मिळण्याची शक्यता मक्का भाव महाराष्ट्र
मागील वर्षाचा जर विचार केला तर याच देशातून २४० लक्ष टन मक्याची निर्यात करण्यात आली होती. हाच मका यावर्षी मात्र केवळ ९० लक्ष टनावर स्थिरावेल असा अंदाज आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेची निर्यात देखील ५३ लाख टनांनी कमी राहण्याची शक्यता आहे.
मंगळवारी म्हणजेच काल शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडवर मक्याच्या वायद्यात २ टक्के सुधारणा झालेली दिसली. दलीयन एक्सचेंजवर देखील मक्याचा वाढीव दर टिकून आहे.
भारतामध्ये मक्याला सध्या २,३०० ते २०७०० एवढा दर मिळणार आहे. येणाऱ्या काळात हा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच हा दर ३ हजार प्रती क्विंटल पेक्षा जास्त जावू शकतो.
योग्य लागवड केल्यास शेती फायद्यात
तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्या शेतामध्ये तुम्ही मक्याचे पिक घेतले असेल तर नक्कीच हि तुमच्यासाठी आनंदाची बातमी ठरणार आहे.
मका पिकांचे व्यवस्थापन उत्तम पद्धतीने केल्यास शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल व आपसूकच पैसाही जास्त मिळणार आहे.
शेतकरी बांधवानी नेहमीच बाजारभाव लक्षात घेवून आपल्या शेतामध्ये योग्य ती पिके लावावीत जेणे करून दोन पैसे जास्त मिळू शकेल.
या वर्षी मका पिकाचे उत्पदान कमी निघणार असल्याने मका या पिकास भाव मिळणार आहे. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या पिकांचे बाजार भाव तसेच मागणी आणि पुरवठा लक्षात घेवून पिकांची लागवड केल्यास शेतकर्यांना याचा फायदा होऊ शकतो.