५० हजार प्रोत्साहन अनुदान हवे आहे मग करा हे काम तरच मिळेल लाभ

नमस्कार शेतकरी बंधूंनो महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजनेंतर्गत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पत्येकी ५० हजार प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. या अनुदानासंदर्भात खूप दिवसापासून चर्चा सुरू होती की ५० हजार प्रोत्साहन अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना कधी घेता येणार आहे असा प्रश्न प्रत्येक शेतकाऱ्यांच्या मनात धडकट होता.

आता आशा शेतकऱ्यांची प्रतीक्षा जवळपास संपलेली आहे शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान देण्यासाठी आता बँकेच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.

५० हजार प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना सप्टेंबर या महिन्यात वापट सुरू करण्यात येणार आहे त्यासाठी बँकेने याद्या तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

हेही वाचा विधवा महिला योजना २४ हजार रुपये मिळणार करा ऑनलाईन अर्ज

५० हजार प्रोत्साहन अनुदान हवे आहे मग हे काम करा

शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान मिळण्यास सुरुवात होत आहे त्यासाठी शेतकऱ्यांना एक महत्वाचे काम करायचे आहे तेव्हाच शेतकऱ्यांना ५० हजार मिळू शकता अन्यथा नाही.

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजनेंतर्गत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी याद्या तयार करण्याचे काम बँकाकडून सुरू करण्यात आले आहे. पण या योजनेत पात्र शेतकऱ्यांनी ५० हजार प्रोत्साहन अनुदान मिळवण्यासाठी आपले आधार बँक खत्याशी जोडणे अत्यंत महत्वाचे आहे.

तेव्हाच शेतकऱ्यांना या योजनाचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे विशिष्ट क्रमांक आल्यावर लगेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५० हजार प्रोत्साहन अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे

५० हजार अनुदान लवकरच बँक खात्यात जमा

५० हजार रक्कम कधी मिळेल याकडे अनेक शेतकरी बांधवांचे लक्ष लागलेले होते. या संदर्भातील प्रतीक्षा आता लवकरच संपू शकते. त्यामुळे हि शेतकरी बांधवांसाठी नक्कीच आनंदाची बातमी ठरणार आहे.

२०१८-१९ मध्ये अतिवृष्टीग्रस्त अनेक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. या योजनेत २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या कालावधीत बँक किंवा संस्थांकडून घेतलेले कर्ज पात्र आहे.

50 हजार प्रोत्साहन योजना मध्ये बदल

याच काळात म्हणजेच २०२० मध्ये कोरोन परिस्थिती चिघळली होती त्यामुळे महाराष्ट्र राज्याची आर्थिक घडी विस्कटून घेली होती परिणामी ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ शेतकऱ्यांना वितरीत करता आले नाहीत.

आता महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ शेतकऱ्यांना लवकरच वितरीत केला जाणार आहे.

खालील शेतकरी या योजनेस पात्र राहणार नाही

  • ज्या शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती २०१९ योजनेचा लाभ घेतलेला आहे.
  • म्हणजेच या योजना अंतर्गत त्यांना कर्जमाफी मिळालेली आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार नाही.
  • राज्य किंवा केंद्र शासनाची नोकरी करणारे कर्मचारी या योजनेसाठी पात्र नसणार आहेत.
  • मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी ज्यांचा पगार २५००० पेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • शेती व्यतिरिक्त आय कर भरणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेवू शकणार नाहीत.

Leave a comment