राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी आहे आता वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी करता येणार आहे त्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा. म्हणजे १ जानेवारी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता यायची.
मात्र २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या एक तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्षे पूर्ण होतील,
त्यांना ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या विशेष मोहिमेअंतर्गत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे.
आणखी कामाची योजना बांधकाम कामगार नोंदणी आता अधिक सोपी
मतदार यादी सुद्धा प्रकाशित होणार
निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते.
९ नोव्हेंबर रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयामध्ये प्रारूप यादी प्रकाशित केली जाईल.
मतदारांनी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इ. तपशील मतदारयादीत तपासून ते अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे.
बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदारयादीत नाही,
अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. त्यामुळे मतदारांनी प्रारूप मतदार यादीतील आपले तपशील आत्ताच तपासणे महत्त्वाचे आहे.
९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ हा कालावधी मतदार नोंदणीचा आहे, तसा तो एखाद्याच्या नावासंबधी हरकती घेण्याचाही आहे.
एखाद्या मतदारसंघातील मतदार यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल, तर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो.
त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते.
मतदारयाद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदाराची वगळणीही महत्त्वाची असते.
अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा
यंदाच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने १९ व २० नोव्हेंबर आणि ३ व ४ डिसेंबर या दिवशी राज्यभर विशेष शिबिराचे आयोजन केले जाणार आहे.
तसेच वंचित घटकांसाठी खास शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
महिला आणि दिव्यांग यांच्या नाव नोंदणीसाठी १२ व १३ नोव्हेंबर रोजी, तर २६ व २७ नोव्हेंबर रोजी तृतीयपंथी नागरिक, देह व्यवसाय करणाऱ्या महिला,
आणि घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीचे नागरिक यांच्या नाव नोंदणीसाठी राज्यभर विशेष शिबिरे घेतली जातील.
तसेच तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्र संघटन, भारत स्काऊट
यांच्या सहकार्याने राज्यभर मतदार नोंदणीची शिबिरे राबवण्यात येणार आहेत
शिवाय, मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या या सुविधा एनव्हीएसपी (NVSP), व्होटर पोर्टल (Voter Portal)
या संकेतस्थळावर आणि व्होटर हेल्पलाईन (Voter Helpline) या मोबाइल अॅपवर उपलब्ध आहेत.