पिक विमा लवकरच मिळणार मंत्र्यांनी दिली माहिती.

नमस्कार शेतकरी बंधुंनो पिक विमा लवकरच मिळणार आहे. शेतकरी बांधवाना पिक विमा मिळेल अशी माहिती काही दिनांक १० नोव्हेंबर रोजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आढावा बैठकीमध्ये दिली होती.

८ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना पिक विमा त्यांच्या खात्यावर जमा कारवा अशा सूचना त्यांनी संबधितांना दिल्या होत्या जाणून घेवूयात या संदर्भातील संपूर्ण माहिती.

खरीप हंगामामध्ये शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणत नुकसान झाले होते. प्रधान मंत्री फासल बिमा योजना अंतर्गत अनेक शेतकरी त्यांच्या शेतातील पिकांचा पिक विमा काढलेला होता.

पिकांचे नुकसान झाल्यास पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना पिक नुकसानभरपाई देण्यात येते हे आपणाला माहितच आहे.

अनेक शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांचे क्लेम देखील पिक विमा कंपनीस केलेलं आहेत. राज्यात पिक विमा प्रश्न प्रलंबित आहे.

आणखी कामाची माहिती विहीर अनुदान योजना 4 लाख अनुदान

आनंदाची बातमी पिक विमा लवकरच मिळणार

शेतकऱ्यांच्या पिक विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर पाच दिवसात कार्यवाही करुन येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विम्याची रक्कम जमा करावी,

अशा सूचना दिनांक १० नोव्हेंबर २०२२ रोजी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबधितांना दिल्या होत्या.

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद विभागीय कार्यालयात प्रधान मंत्री खरीप पिक विमा २०२२ संदर्भात आढावा बैठक घेतली होती.

पिक विम्याचे पैसे जर लवकर शेतकऱ्यांना  मिळाले नाहीत तर, चालढकल करणाऱ्या विमा कंपन्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा देखील त्यांनी दिला होता.

नैसर्गिक आपत्तीत निश्चित नुकसान भरपाई रुपये 1074 कोटी 17 लाख 77 हजार अर्जांचे नुकसान भरपाई रक्कम विमा कंपनीकडून निश्चित करणे बाकी आहे.

ती रक्कम तत्काळ निश्चित करण्याच्या सूचना श्री.सत्तार यांनी दिल्या आहेत.

पिक विमा प्रश्न प्रलंबित

नैसर्गिक आपत्तीत निश्चित झालेल्या 1073 कोटी रुपये नुकसान भरपाई पैकी केवळ 96.53 कोटी एवढी रक्कम 3 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे.

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली व परभणी या तीन जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झालेले आहे.

या जिल्ह्यातील 5 लाख शेतकऱ्यांचे सर्वेक्षण झाले असून उर्वरित 21 हजार शेतकऱ्यांचे सर्वेक्षण बाकी आहे. बाकी असलेले सर्वेक्षण संबंधित यंत्रणेने पूर्ण करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेला आहेत.

काही ठिकाणी ऑफलाईन अर्ज करण्यात आलेले आहेत यापुढे प्रत्येक तालुक्यात एक व्यक्ती नेमून ऑफलाईन अर्ज देखील ऑनलाईन करुन घेण्याच्या सूचना कृषी मंत्र्यांनी संबधितांना दिलेल्या आहेत

अधिक महितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment