नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना 3000 कोटी रुपये जाहीर केले आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
या योजनेतून शेतकऱ्यांना हेक्टरी 15 हजार रुपये मिळणार आहे आणि ही मदत 2 हेक्टर पर्यंत मिळणार असून शेतकऱ्यांना 30 हजारची आर्थिक मदत मिळणार आहे.
विदर्भ व मराठवढ्यातील शेतकऱ्यांच्या अर्थीक उन्नतीसाठी कापूस आणि सोयबिनच्या मूल्य साखळी विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी 3000 कोटी निधीस मंजूरी देण्यात आली आहे.
ही योजना राज्य सरकार 2025 पर्यंत राबविणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी झालेल्या विधानसभेत माहिती दिली.
आणखी कामाची योजना प्रधानमंत्री स्वनिधी योजना 50 हजार मिळणार बिनव्यजी कर्ज
विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 15 हजार रुपये
विदर्भा व मराठवढ्याच्या विकासाशिवाय महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास पूर्ण होऊ शकत नाही
हे सांगताना धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.
हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भ व मराठवाड्यातील कोणते पेकेज घोषित करणार याची उत्सुकता होती.
अपेक्षेप्रमाणेच मुख्यमंत्री यांनी घोषणाची बरसात केली.
जिनिग आणि प्रोसेसिंग यूनिट, ड्रॉन द्वारे औषधांच्या फवारणीसाठी अनुदान,
बीजबिया प्रक्रिया यूनिट, तेलबिया प्रक्रिया यूनिट, जैविक विनिष्टा निर्मितीकरिता मास्टर लेब आशा विविध गोष्टीची सांगड घालण्यात येणार आहे.
धान उत्पादकांना हेक्टरी 15 हजाराचा बोनस
राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 15 हजाराचा बोनस देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दोन हेक्टर पर्यंत हा बोनस दिला जाणार आहे.
म्हणजेच या योजनेतून शेतकऱ्यांना 30 हजाराचा लाभ होणार आहे. या बोनसचा लाभ राज्यातील पाच लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.
नवे वस्त्रोउद्योग आणि खनिकर्म धोरण देखील आणणार.
विदर्भात मोठा खनिज साठा आहे चंद्रपूर जिल्ह्यात सोन्याच्या दोन खानी असल्याचा अहवाल आला आहे. विदर्भात लवकरच सोन्याचे दिवस येणार आहे.
येथील खनिजावर तेथेच प्रक्रिया केली जाणार आहे खनिज, ऊर्जा, पानी, वन, शेती ही विदर्भाची बालस्थाने आहे.
येणाऱ्या काळात उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात विदर्भ क्रांति करणार असल्याची मुख्यमंत्री यांनी सांगितले.
अधिक महितीसाठी येथे क्लिक करा.