नमस्कार शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर योजनेसाठी 56 कोटी निधी आला आहे व त्यामध्ये लागणाऱ्या विविध अवजारे यांच्यासाठी देखील निधी आलेला आहे त्या संदर्भात माहिती जाणून घेऊया.
या ठिकाणी तुम्ही या योजनेचा लाभ अजून देखील घेतलेला नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ कसा घेता येईल व त्यासाठी अर्ज कसा करावा लागतो याची देखील महिती जाणून घेऊया.
आता पर्यंत राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेऊया आपल्या शेतीमध्ये प्रगती केली आहे तशी तुम्ही देखील करू शकता.
ट्रॅक्टर योजनेसाठी 56 कोटी निधी आला असून त्याचा जी. आर 20 जानेवारी 2023 ला आलेला आहे.
आणखी कामाची योजना Handicap Pension Scheme 2023 अपंग पेन्शन योजना
ट्रॅक्टर योजनेसाठी 56 कोटी निधी आला
कृषि विभागामार्फत विवध केंद्र पुरस्कृत योजणाची तसेच सहहाय्यता प्रकल्पाची अंबलबाजवणी केली जाते.
केंद्र पुरस्कृत योजनेची वार्षिक कृती आराखडे अंतिम झाल्यानंतर शासन शासनास वर्षभरात एक किंवा दोन टप्प्यात निधी मिळतो त्याच प्रमाणे राज्य पुरस्कृत योजनेलाही दोन टप्प्यात निधी प्राप्त होतो.
कृषि योजनेचा निधी टप्प्या टप्प्याने प्राप्त होत असला तरी कृषि क्षेत्राचे कामकाज ही हंगामा निहाय चालत असते.
खरीप व रब्बी हंगामात लागवडी खाली येणाऱ्या क्षेत्रयापैकी सुमारे 75 टक्के क्षेत्रावर खरीप हंगामात विविध विकांची लागवड होते.
त्यामुळे खरीप हंगाम हा अर्थव्यवस्थेयच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.
या हंगामातील पिकांना पूरक ठरणाऱ्या बाबी खरीप हंगाम पूर्व व हंगाम कालावधीतच अंबलबाजवणी करणे आवश्यक ठरते. यामध्ये यंत्रणे व अवजारे बाबींचा समावेश आहे.
शासन निर्णय पहा
सन 2022-23 या वर्षात राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेची अंबलबाजवणी करण्यासाठी माहे रु 56 कोटी कृषि आयुक्त यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात येत आहे.
सादर निधी 2022-23 करिता खर्चित करण्यात येत आहे
अधिक माहितीसाठी जी.आर बघा.
योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज
- तुमच्या कॉम्प्युटरच्या किंवा मोबाईलच्या ब्राउजरच्या सर्च बारमध्ये टाईप करा mahadbt farmer login.
- वरील शब्द किंवा कीवर्ड टाकल्यावर महाडीबीटी योजनेची एक लिंक येईल त्यावर क्लिक करा.
- महाडीबीटी वेब पोर्टल ओपन झाल्यावर लॉगीन करा.
- लॉगीन करण्यासाठी दोन पर्याय तुम्हाला दिसेल १) युजर आयडी आणि पासवर्ड टाकून किंवा आधार क्रमांक टाकून तुम्ही लॉगीन करू शकता.
- तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करावी लागेल.
- नोंदणी करण्यासाठी आवशयक नोदणी या पर्यायावर क्लिक करा.
नोंदणी साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड ( असेल तर )
- बँक पासबुक
- सातबारा
- ८ अ
कागदपात्रांची पूर्तता केल्यानंतर असा करा ट्रॅक्टर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज.
- युजर आयडी आणि पासवर्ड टाकून किंवा आधार क्रमांक टाकून तुम्ही लॉगीन करा.
- अर्ज करा या निळ्या रंगाच्या बटनावर क्लिक करा.
- कृषी यांत्रिकीकरण या पर्यायासामोरील बाबी निवडा या बटनावर क्लिक करा.
- आवश्यक असलेली माहिती भरा.
- संपूर्ण माहिती भरल्यानंतर जतन करा या बटनावर क्लिक करा.