Nukasan Bharpai राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज सादर आहे नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी पाहूया.
राज्यात गेल्या पंधरवाड्यात दोन वेळा झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या लाखों शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे अर्ज केले आहे.
विमा कंपन्या याविषयी प्राधान्याने भरपाई करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे तर पिके काढण्याच्या स्थितीत असताना नुकसान झाल्याने भरपाई चांगली मिळेल असा अंदाज कृषि विभागाने व्यक्त केला आहे.
आणखी कामाची योजना Beej Bhandwal Yojana बीज भांडवल कर्ज योजना
Nukasan Bharpai लाखो शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईसाठी अर्ज
राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज केलेले आहे या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठे नुकसान केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त नुकसान भरपाईची आशा आहे.
राज्यात होळीच्या काळात तसेच गेल्या आठवड्यात दोन वेळा अवकाळी पासून व गारपिठीने शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप नुकसान केले आहे.
काढणीला आलेल्या पिकाला फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. अनेक जिल्ह्यामध्ये गहू, हरभरा काढणीला आलेला होता.
तर काही शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकावर पावसाने पानी फिरवल्याने पिके नष्ट झाली आहे. यासाठी आता शेतकऱ्यांना शासनाच्या अनुदानाची आवश्यकता आहे.
त्यामुळे राज्यातील लाखों शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी पीक विमा कंपनीकडे अर्ज केले आहे अजूनही बरेच शेतकरी यांना माहीत नाही की हा अर्ज कसा करावा लागतो.
तर शेतकरी बंधूंनो तुम्ही जर अजूनही अर्ज केला नाही किंवा तुम्हाला माहीत नाही की विमा कंपनीकडे अर्ज कसा करावा लागतो तर या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.
असा करा नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज
- गुगल प्ले स्टोअरच्या सर्च बारमध्ये crop insurance application असा कीवर्ड टाकून सर्च करा.
- crop insurance application इंस्टाल करा.
- क्रॉप इन्शुरन्स ॲप ओपन करा.
- continue without login या पर्यायावर टच करा.
- crop loss या पर्यायावर टच करा.
- त्यानंतर crop loss intimation या पर्यायावर टच करा.
- मोबाईल नंबर दिलेल्या चौकटीत टाका आणि सेंट otp या पर्यायावर टच करा.
- तुमच्या मोबाईलवर आलेला otp दिलेल्या चौकटीत टाकून Verify करा.
- आता तुम्हाला पिकांविषयी माहिती सादर करायची आहे ज्यामध्ये सीजनमध्ये रब्बी हा पर्याय निवडा. Year मध्ये 2023 हा पर्याय निवडा.
- Scheme मध्ये pradhan mantri fasal bima yojana हा पर्याय निवडा.
- State मध्ये महाराष्ट्र हा पर्याय निवडा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
इतर म्हत्वाची माहिती भरा.
संपूर्ण माहिती व्यवस्थित निवडल्यानंतर सिलेक्ट या पर्यायावर टच करा. पिक विमा भरतांना ज्या ठिकाणी अर्ज सादर केला असेल तो पर्याय निवडावा, जसे कि सीएससी, बँक, शेतकरी स्वतः किंवा मध्यस्थीने.
शक्यतो बरेच शेतकरी बांधव सीएससी सेंटरवर त्यांचा ऑनलाईन अर्ज सादर करतात त्यामुळे सीएससी हा पर्याय निवडावा.
तुमच्याकडे पिक विमा पावती असेल तर Do you have policy number हा पर्याय चालू करा. पिक विमा पावती वरील पॉलिसी नंबर दिलेल्या चौकटीत टाका आणि done या बटनावर टच करा.
तुम्हाला तुमचा पॉलिसी नंबर दिसेल त्यावर त्यासमोर दिलेल्या चौकटीत टच करा.
जसे हि तुम्ही टच कराल त्यावेळी तुमच्या पॉलिसीची संपूर्ण माहिती तुम्हाला मोबाईल स्क्रीनवर दिसेल तुम्ही कोणकोणत्या पिकांचा पिक विमा काढलेला आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी दिसेल.
ज्या पिकांचे नुकसान झाले असेल त्या पिकासमोर टच करा. Type of incidence यामध्ये अनेक पर्याय दिसतील त्यापैकी excess rainfall या पर्यायावर टच करा.
Date of incidence मध्ये ज्या दिवशी पिकांचे नुकसान झाले ती तारीख निवडा. पिकाची स्थिती कशी आहे standing crop, harvested, cut and spread or bundled condition for drying.
नुकसान झाले त्यावेळी पिक उभे आहे गोळा केलेले आही किंवा पिकांची कापणी करून शेतामध्ये त्याच्या पेंड्या घालून वाळविण्यासाठी ठेवलेले आहे.
ज्या स्थितीत पिक असेल तो पर्याय शेतकरी बांधवानी या ठिकाणी निवडावा.
किती टक्के नुकसान झाले ती टक्केवारी दिलेल्या चौकटीत टाका. फोटो आणि व्हिडीओ काढून अपलोड करा आणि त्यानंतर सबमिट करा.