सरकारी केंद्रातून घर बाधकामसाठी आता सरकार मार्फत वाळू कमी भावात मिळणार आहे त्यासाठी शासनाने नवीन धोरण आखले आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी पाहूया.
राज्यातील नागरिकांना घर बाधकामसाठी आता कमी पैसे मोजावे लागणार आहे कारण आता घर बाधणाऱ्यांना सरकार कमी भावात वाळू उपलब्ध करून देणार आहे.
मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की सध्या वाळूचे भाव ही खूप वाढले आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला वाळू खरेदी करणे आणि घर बाधने ही खूप अवघड झाले आहे.
आता आशा सर्वसामान्य जनतेचा वाळू वरील खर्च वाचणार आहे त्यामुळे लोकांना घर बाधकामासाठी मोठी मदत देखील होणार आहे.
सध्या वाळूचे खूप महाग असल्याने शासनामार्फत ही वाळू कमी भावात दिली जाणार आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार आहे.
आणखी कामाची योजना लॅपटॉप अनुदान योजना अर्ज करणे सुरू असा करा अर्ज
सरकारी केंद्रातून आता वाळू मिळणार कमी भावात
नवीन वाळू धोरणानुसार महसूल विभागाकडून वाळू खरेदी केली जाणार आहे त्यामुळे प्रचंड महाग झालेली वाळू आता स्वस्तात मिळणार आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळूच्या अवैध उत्खनन प्रतिबंधसाठी राज्य सरकार घरपोच वाळू देणार असल्याचे त्यांनी अहमदनगर येथील एका कार्यक्रमात सांगितले होते.
परंतु अद्याप नवीन वाळू संदर्भात कोणत्याही सूचना आल्या नसल्याचे बीड येथील गौण खनिज विभागाने सांगितले आहे.
पहा कधी सुरू होणार वाळूचे डेपो
महसूल मंत्री विखे पाटील यांनी नवीन वाळू धोरणाची माहिती माध्यमाद्वारे कळवली आहे
मात्र त्याबाबत अद्याप काही सूचना प्राप्त झाल्यास नसल्याचे बीड येथील गौण खनिज विभागाने सांगितले आहे.
सध्या बाजारात वाळूचे भाव ही 7 हजार ब्रास चालू आहे राज्यातील वाळू उपसा बंद असल्याने ही भाव वाढत आहे.
आजही गेवराई पट्टयातून अवैधरित्या वाळू उपसा करून बीड जिल्ह्यात विक्री होत आहे.
वाळूचे भाव सर्वाधिक कमी होणार
Government sand सरकारी डेपोतून सर्वसामान्य जनतेला वाळू खरेदी करता येणार आहे कमी दरात वाळू मिळणार असल्याने अवैध वाळू विक्रीला आलं बसणार आहे.
राज्यातील जनतेला सरकारी केंद्रातून वाळू विकली जाणार आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक तालुक्यात वाळूचे दोन ते तीन डेपो उघडले जाणार आहे.
या संदर्भात महसूल विभागाकडून जागा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे.
त्याच ठिकाणी साठा व वाळूचे मोजमाप केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रारंभी वाळूचा साठा करण्यासाठी डेपो उघडले जातील ज्या तालुक्याच्या ठिकाणी जास्त वाळूघाट असेल येथे वाळूचे डेपो उघडले जाणार आहे.
गेवराई व माजलगाव तालुक्यात जास्त डेपो उघडले जातील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.