दिवाळीला शेतकऱ्यांच्या खात्यात विमा कंपन्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन त्यांच्या अडचणी दूर केल्या आहेत.
ज्या महसूल मंडळात ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तेथे आणि सलग २१ दिवस पावसाचा खंड पडलेल्या मंडळातील शेतकऱ्यांना अग्रीम देण्याचा निर्णय झाला आहे.
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ती रक्कम मिळेल, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. मुंडे आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. Crop insurance list 2023
कांद्याला आम्ही २ हजार ७१० रुपये बाजार भाव दिला. त्यावेळेस माध्यमांनी त्याची बातमी केली नाही. मात्र, काहीतरी उघडल्यास तो मुद्दा उचलून धरायचा, हे चुकीचे आहे. अजितदादांनी पीयुष गोयल यांच्यासोबत बैठक घेऊन खरेदीचा निर्णय घेतला.
त्यासाठी २ हजार २०० रुपये भाव देण्याचा निर्णय घेतला, हासुद्धा ऐतिहासिक निर्णय आहे. त्याकडे माध्यमांनी दुर्लक्ष केल्याची खंत मुंडे यांनी व्यक्त केली.
दिवाळीला शेतकऱ्यांच्या खात्यात
धनंजयचा संग्राम आणि संग्रामात धनंजय हे दोन्ही एकच आहेत. हा शब्दाचा गंध आहे. तुम्हाला काय समजायचे ते समजून जा, असे म्हणत त्यांनी साहित्यिक टिप्पणी केली. भैयांनी खूप माणसं वाचली.
परंतु आता त्यांनी पुस्तक वाचली पाहिजेत, असा सल्लाही मुंडे यांनी दिला. दिवाळीला शेतकऱ्यांच्या खात्यात
राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्याचा विषय निवडणूक आयोगाकडे आहे. ज्यांच्या गटाकडे लोकशाहीनुसार जास्त संख्याबळ आहे, त्यानुसारच आयोग निर्णय घेईल. अजितदादांच्या गटाकडे सर्वाधिक आमदार व पदाधिकारी आहेत,
असा दावा मुंडे यांनी व्यक्त केला. खासदार संजय राऊत यांच्याबाबत विचारले असता ते म्हणाले, राऊतांना किती महत्त्व द्यायचे हे तुम्हीच ठरवले पाहिजे.