Nuksan Bharpai 2023 नमस्कार मित्रांनो आज शेतकरी बांधवांसाठी विशेष करून 11 जिल्ह्यातील 14 लाख शेतकरी मित्रांसाठी नुकसान भरपाई ची मदत मंजूर करण्यात आलेली आहे. आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे. जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र सरकारने जून आणि जुलै 2023 या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये झालेली जी अतिवृष्टी आहे. तसेच जी पूर परिस्थिती आहे यामुळे शेती पिकांच्या आणि शेत जमिनीच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी अतिवृष्टी ग्रस्त शेतकरी बांधवांना मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तब्बल 1 हजार 71 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे.
तसेच मित्रांनो या मदतीचा लाभ हा आपल्या महाराष्ट्र राज्यांमधील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या ११ जिल्ह्यातील तब्बल 14 लाख 9 हजार 318 अतिवृष्टी ग्रस्त शेतकरी मित्रांना होणार आहे. मित्रांनो शेतकरी बांधवांना त्यांच्या खात्यामध्ये ही नुकसान भरपाईची मदत जी आहे ती डीबीटी द्वारे जमा करण्यात येणार आहे. चक्रीवादळ तसेच यासारख्या इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे झालेले नुकसान तसेच पुढील हंगामामध्ये शेतकरी मित्रांना कोणतीही अडचण न यावी यासाठी हे पैसे उपयोगी पडावे यासाठी शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येत आहे. Nuksan Bharpai 2023
मित्रांनो या मदतीसाठी केंद्र सरकारने चक्रीवादळ, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीसाठी विहित केलेल्या अटी आणि नियमांचे पालन केले जाणार आहे. तसेच राज्य शासना अंतर्गत घोषित झालेल्या अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीसाठी अतिवृष्टीच्या नियमाप्रमाणे मंडळामध्ये 24 तासांमध्ये 65 मिलिमीटर पेक्षा जास्त नोंद झालेली असल्यास आणि त्यामुळे मंडळातील गावांमध्ये 33% पेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेले असल्यास ही मदत मिळणार आहे. पण मित्रांनो ज्या ठिकाणी पूर आलेला असेल त्या ठिकाणी अतिवृष्टीचा निकष लागू असणार नाही हे देखील लक्षात असू द्या. आणि या मदतीने शेतकरी बांधवांना त्यांच्या आर्थिक नुकसान भरपाई भरून काढण्यास मदत होणार आहे आणि शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नवीन शेती सुरू करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे हाच यामागील उद्देश आहे.