पीएम किसान निधीचा १६ वा हप्ता जानेवारी मध्ये या तारखेला होणार जमा

पीएम किसान निधीचा १६ वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पुढच्या महिन्यात म्हणजेच जानेवारी मध्ये जमा होणार आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

पीएम किसान निधीच्या लाभार्थीसाठी शासन विशेष मोहीम राबवत आहे यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान निधीचा लाभ मिळत नाही त्यांना देखील लाभ दिला जाणार आहे.

किसान सन्मान निधी योजनेंतर्गत गावपातळीवर विशेष मोहीम पूर्वीच आदेश दिले आहेत. पीएम किसान निधीचा १६ वा हप्ता

जानेवारी २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात पीएम किसान योजनेचा सोळावा वितरीत करण्यापूर्वी मोहिमेची कालबद्ध पद्धतीने अंबलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

दोन टप्प्यात राबवली जाणार मोहीम

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची संपूक्तता साध्य करण्यासाठी दोन टप्प्यात कामकाज करण्यात येणार आहे

पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील पीएम किसान योजनेतील बँक खाते आधार सलग्न नसलेले, ई केवायसी प्रलंबित असलेले स्वयनोंदणी लाभार्थी मान्यता प्रलंबित असलेले व स्टोप पेमेंट असलेले लाभार्थी याबाबत प्राधान्याने कार्यवाही सुरु करावी.

दुसऱ्या टप्प्यामध्ये ७ जानेवारी २०२४ पर्यंत जिल्ह्यात भू अभिलेख नोंदी प्रलंबित असलेल्या लाभार्थीची नोंद पूर्ण करणे व गावातील नवीन पात्र लाभार्थीचा शोध घेऊन त्याची पीएम किसान योजनेमध्ये नोदणी करण्याबाबत कार्यवाही करायची आहे.

त्यानंतर गाव, तालुका, जिल्हा कोणतेही पात्र कुटुंब पीएम किसान योजनेत समाविष्ट करण्याचे राहिले नसल्याचे प्रमाणपत्र कृषी आयुक्तालायास सादर करावे अशा सूचना दिल्या आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment