Advance Crop Insurance या वर्षी खरीप हंगामध्ये सांगली जिल्ह्यात वेळोवेळी अवकाळी आणि अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले.
सांगली जिल्ह्यामध्ये 3 लाख 77 हजार ७५८ शेतकऱ्यांनी या वर्षी एका रुपयात पिक विमा काढला आहे पहिल्या टप्प्यात ९७ हजार ३७२ शेतकऱ्यांना अग्रिम पिक विमा मंजूर झाला.
७६ हजार ७१३ शेतकऱ्यांची रक्कम संबंधित विभागाकडे प्राप्त झाली आहे त्यापैकी ६१ हजार ८२० शेतकऱ्यांना १६ कोटी ७० लाख ८८ हजार रक्कम खात्यावर जमा करण्यात आली आहे. Advance Crop Insurance
अग्रिम पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे काम सुरु असल्यामुळे दुसरा टप्पा कधी येईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
3 लाख 77 हजार शेतकऱ्यांनी या वर्षी एका रुपयात पिक विमा काढला असून जिल्ह्यामध्ये 1 लाख ९२ हजार ११ हेक्टर वरील पिकांना संरक्षण दिले आहे.
जिल्ह्यात या वर्षी पाऊस कमी झाला त्यामुळे खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम पिक विमा रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
- ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी न झालेले पात्र शेतकरी संख्या १०७०७
- संरक्षित रक्कम ५ कोटी ५७ लाख ३६ हजार
- विमा दिलेले शेतकरी संख्या ८६३९
- संरक्षित रक्कम ४ कोटी ६५ लाख ३ हजार
- उर्वरित शेतकरी संख्या २०८६
- संरक्षित रक्कम ९२ लाख ३३ हजार
- हवामानातील प्रतिकूल परिस्थिती
- पात्र शेतकरी संख्या ६६१०६
- संरक्षित रक्कम १३ कोटी ८० लाख ६ हजार
- विमा दिलेले शेतकरी संख्या ५३१८१
- संरक्षित रक्कम १२ कोटी ०५ लाख ८५ हजार
- उर्वरित शेतकरी संख्या १२९२५
- संरक्षित रक्कम १ कोटी ७४ लाख ७२ हजार