अतिवृष्टी नुकसान भरपाई व नैसर्गिक आपत्ति अनुदान वाटप सुरू झाले आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही यासाठी काय करावे या संदर्भात माहिती या ठिकाणी जाऊन घेऊया.
शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाईचा लाभ मिळाला नसल्यास ई केवायसी करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.
सप्टेंबर व ऑक्टोबर 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना केंद्रीभूत पद्धतीने थेट लाभार्थी हस्तांतरण प्रणाली मार्फत मदत दिली जाणार आहे.
महात्मा ज्योतिराव शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत योजनेचा लाभ या प्रणालीमार्फत राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिला जाणार आहे.
अतिवृष्टी नुकसान भरपाई खात्यात होणार जमा
या योजनेची अंबलबजावणी सुरू झाली असून या प्रणालीमध्ये शेतपिकांच्या शेतजमिनीच्या नुकसांनीपोटी द्यायच्या मदतीबाबतची लाभार्थीची माहिती खालील लिंक प्रणाली मध्ये भरण्यात आली आहे.
तरीही आतापर्यंत ज्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झालेला नाही त्या शेतकऱ्यांनी ई केवायसी करण्याचे आवाहन शासनाने केले आहे.
राज्यातील बरेच शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाई पासून अजूनही वंचित आहे आशा शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ ई केवायसी करण्याचे आवाहन केले आहे.
अतिवृष्टीचा लाभ मिळाला नसल्यास काय करावे
- अतिवृष्टी अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी लभार्थीनि आपले बँक खाते आधारशी लिंक करून घ्यावे.
- आपला आधार क्रमांक मोबाईल क्रमांकाशी लिंक करून घ्यावा.
- बँक खाते आधार लिंक आहे का ते तपासून घ्यावे .
- बँक खाते अकटीव्ह करून घ्यावे.
वरील कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर अर्जदराने आधार प्रमाणिकरणासाठी आपले व्ही. के लिस्टवरुण नोंदणी करून आपले सेवा केंद्रामध्ये जाऊन ई केवायसी करायचे आहे.
ई केवायसी केल्याशिवाय लाभार्थीची लाभार्थी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार नाही.
ई केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बचत पासबूक खाते
- यादीतील आपल्या नावसमोर नमूद असलेला विशिष्ट क्रमांक.
- काही विसंगती असल्यास त्याबाबत शेतकरी तशी तक्रार संबंधित पोर्टलवर असहमतीचे बटन दाबून करू शकता.
- आधार प्रमाणीकरण सेवा निशुल्क आहे.
- विशिष्ट क्रमांकासह यादी वाचन करण्यासाठी व शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरणासाठी संबंधित ग्रामसेवक व तलाठी यांचे मार्गदर्शन घ्यावे.
आशा पद्धतीने तुम्ही ई केवायसी आणि संबंधित कागदपत्रे व्यवस्थित भरून अतिवृष्टीचे अनुदान तुमच्या बँक खात्यात जमा करून घेऊ शकता.
यामध्ये वरील लेखामध्ये दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून तुम्ही तुमची ई केवयासी करू शकता.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा