पिठाची चक्की अर्ज सुरु. महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने पिठाची चक्की ऑनलाईन अर्ज सुरु. जाणून घेवूयात या योजना संदर्भातील सविस्तर माहिती.
महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत जिल्हा परिषद सेस 2023-24 अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना द्वारे हि पिठाची चक्की योजना राबविली जात आहे.
पिठाची चक्की योजनेसह महिलांना पिको व फॉल मशीन या योजनेसाठी देखील अर्ज करता येणार आहे. तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर 22 फेब्रुवारी 2024 च्या आत महिला व बाल कल्याण विभाग बुलढाणा या कार्यालयात अर्ज सादर करून द्या.
कोणाला मिळेल लाभ
पिठाची चक्की या योजनेसाठी केवळ अपंग महिला व मुली अर्ज करू शकतात तर पिको व फॉल मशीनसाठी इतर महिला अर्ज करू शकणार आहेत.
कागदपत्रे
- विहित नमुन्यातील अर्ज.
- शौचालयाबाबतचा ग्रामसेवक यांचा दाखला.
- पंचायत समिती विस्तार अधिकारी यांचे प्रमाणपत्र.
- गटविकास अधिकारी यांचे अभिप्राय प्रमाणपत्र.
अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत
- अर्जदाराचा वयाचा दाखला किंवा TCची छायांकित प्रत
- अर्जदाराचा उत्पन्न दाखला.
- आधार कार्डची छायांकित प्रत.
- बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
- इलेक्ट्रिक बिलाची छायांकित प्रत
इत्यादी कागदपत्रे अर्ज करतांना सादर करावी लागणार आहे. तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर शेवटच्या तारखेच्या आत तुमचा अर्ज सादर करून द्या.