नोव्हेंबर २०२३ मध्ये अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३७ कोटी निधी मिळणार आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.
सिल्लोड तालुक्यात २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२३ मध्ये अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यासाठी ३७ कोटी ४७ लाख ३४ हजार ४०० रुपयाची मदत प्रशासनाला प्राप्त झाली आहे.
२६ नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते कापूस, तूर तसेच इतर शेतीमाल शेतकऱ्यांच्या हाती येत असतानाच निसर्गाच्या आकृपेने पिके हातातून गेली होती.
प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर केला होता त्यानुसार तालुक्यातील १३१ गावातील २७ हजार ५५४ हेक्टर वरील क्षेत्र अवकाळीच्या विळख्यात सापडल्याचा अहवाल दिला होता.
यामुळे ६८ हजार ९०१ खातेदार शेतकऱ्यांना अवकाळीच्या फाटक्यामध्ये झालेल्या नुकसानीची अनुदान रक्कम मिळाली आहे
यासाठी ३७ कोटी ४७ लाख ३४ हजार ४०० रुपयाची मदत लवकरच तालुका प्रशासन वाटप करणार आहे.
मंडळानिहाय यादी पहा
मंडळ | एकूण बाधित क्षेत्र | खातेदार संख्या | मिळणारी रक्कम |
बोरगाव बाजार | ४ हजार ५६२ | 9 हजार ३८ | ६ कोटी २० लाख ४४ हजर ८३२ रुपये |
अमठाना | ४ हजार ३१२ | ८ हजार ९८ | ५ कोटी ८६ लाख 55 हजार १६८ रुपये |
निल्लोड | ४ हजार ६८५ | १० हजार ५७४ | ६ कोटी ३७ लाख १७ हजार ७६८ रुपये |
गोळेगाव बुदुक | 3 हजार २८५ | ७ हजार ९९९ | ४ कोटी ४६ लाख ८३ हजार ४८० रुपये |
भराडी | 1 हजार ९९६ | ४ हजार ७२९ | २ कोटी ७१ लाख ४६ हजार ९६० रुपये |
अजिंठा | 3 हजार ६४१ | ७ हजार ४०६ | ४ कोटी ९५ लाख १८ हजार ५५२ रुपये |
अंभाई | २ हजार ७६१ | ७ हजार ८५५ | 3 कोटी ७६ लाख ६० हजार १६८ रुपये |
सिल्लोड | २ हजार ३०२ | ५ हजार ९०६ | 3 कोटी १३ लाख ७ हजार ४७२ रुपये |